रोजगारासाठी कर्नाटकच्या धर्तीवर कायदा आणा

By कमलेश वानखेडे | Published: July 17, 2024 06:44 PM2024-07-17T18:44:02+5:302024-07-17T18:45:39+5:30

विजय वडेट्टीवार : सरकारचा पराभवाच्या भीतीने योजनांचा सपाटा

Bring a law on the lines of Karnataka for employment | रोजगारासाठी कर्नाटकच्या धर्तीवर कायदा आणा

Bring a law on the lines of Karnataka for employment

नागपूर: महायुती सरकारने पराभवाच्या भीतीने रोज नवीन नवीन योजनांचा सपाटा सुरू केला आहे. राज्यावर संकट असताना उपाययोजना नव्हत्या. रोजगाराच्या  नावावर फसवणूक सुरू आहे. बेरोजगार त्रस्त आहेत.  कर्नाटक सरकारने रोजगारात स्थानिकांना प्राधान्य देण्याचा कायदा केला आहे. पण महाराष्ट्राय नियम आहे. कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कायदा करा, अशी मागणी विधान सभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. काँग्रेसच्या जाहिरनाम्यात याचा समावेश असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

बुधवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे युवक रस्त्यावर आला आहे. ६०० जागांसाठी २५ हजारावर तरुण लाईनमध्ये उभे असतात. बेरोजगारांची होणारी होरपळ थांबविण्यासाठी ठोस उपाय योजण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. 
 

विशालगडावरील घटनेबाबत ते म्हणाले, सरकार सुपारी घेऊन काम करत आहे.  गावाचा संबंध नसताना नालायक लोकांनी हैदोस घातला. सिलेंडर स्फोट केला. घर उडवले. याला सरकार जवाबदार आहे. ५० मीटरवर पोलीस अधिक्षक पांडे थांबले होते. त्यानी लाठीमार करण्याचा इशारा दिला. याप्रकरणी पोलीस अधिक्षकांवर कारवाई करावी व या घटनेचा मास्टर माईंड कोण याचा शोध घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. 

महाविकास आघाडी होणारच
विधानसभेसाठी सगळेच पक्ष चाचपनी करत आहेत. काँग्रेसनेही केली आहे. मात्र, कुणी कितीही आडकाठी आणली तरी महाविकास आघाडी होणारच आहे, असा दावा वडेट्टीवार यांनी केला. महायुती सरकारमध्ये मंत्रीमंडळ विस्तार करणार कसे, अनेकांना शब्द दिले आहेत. गुलाबाचे झाड आहे आणि काटे नाही, असे म्हणणे चुकीचे असल्याचा टोला त्यांनी लगावला.

Web Title: Bring a law on the lines of Karnataka for employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.