नागपूरला स्वच्छता रॅकिंग मध्ये पहिल्या दहा मध्ये आणा : मनपा आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 01:07 IST2020-11-27T01:02:34+5:302020-11-27T01:07:55+5:30
Bring Nagpur in the top ten in cleanliness rankings स्वच्छता सर्वेक्षण २०२०-२०२१ च्या रॅकिंगमध्ये पहिल्या दहा शहरात नागपूरला आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वात मोठी जबाबदारी सफाई कामगारांची आहे. फील्डवर ते काम करतात. त्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले तर नागपूर पहिल्या क्रमांकावर येईल, असे प्रतिपादन महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी यांनी केले.

नागपूरला स्वच्छता रॅकिंग मध्ये पहिल्या दहा मध्ये आणा : मनपा आयुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वच्छता सर्वेक्षण २०२०-२०२१ च्या रॅकिंगमध्ये पहिल्या दहा शहरात नागपूरला आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वात मोठी जबाबदारी सफाई कामगारांची आहे. फील्डवर ते काम करतात. त्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले तर नागपूर पहिल्या क्रमांकावर येईल, असे प्रतिपादन महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी यांनी केले.
स्वच्छता सर्वेक्षण २०२०-२०२१ च्या अनुषंगाने गुरुवारी सतरंजीपुरा झोन कार्यालयात आयोजित उत्कृष्ट कामगार सत्कार समारंभात आयुक्त बोलत होते.
घनकचरा व्यवस्थापन विभागातील प्रभाग क्र. ५, २० व २१ चे सफाई कर्मचाऱ्यांपैकी नीलम सुरेश तांबे, सागर प्रभु, सिपाई पुनम अनिल हजारे या तीन जणाची उत्कृष्ट सफाई कामगार म्हणून निवड करण्यात आली. त्यांना आयुक्तांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी ओला व सुका कचरा वेगवेगळा करणे आवश्यक आहे. नागरिकांना याबद्दल जागृत करणे आणि वेगवेगळ्या डस्टबिनमध्ये कचरा ठेवण्यासाठी प्रोत्साहित करण्याची मनपाची जबाबदारी आहे. स्वच्छतेमध्ये बरीच सुधारणा झाली आहे. आधी मनपाची रॅकिंग ५८ वर होती ती आता १८ वर आली आहे. सर्वाच्या प्रयत्नाने आता याला पहिल्या दहामध्ये आणायचे आहे. स्वच्छतेचे कार्य वर्षभर केल्यानंतर नागरिकांकडून सुध्दा योग्य प्रतिसाद मिळेल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.
ऐजवदारांना नियमित करण्यात येत आहे. सफाई कामगारांचे बाकीचे प्रश्न सुध्दा सोडविण्यात येतील. अशी ग्वाही दिली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांनी मनोगत व्यक्त केले. उपायुक्त व संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ. प्रदीप दासरवार, झोनचे सहा.आयुक्त विजय हुमणे तथा झोनचे सर्व अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.