देशातील घडामोडींसाठी यापुढे ब्रिटिशांना दोष देता येणार नाही : मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 10:44 PM2020-02-27T22:44:41+5:302020-02-27T22:48:00+5:30

गुलाम होतो तेव्हा कसेही वागलेले चालले, आता विचारपूर्वक वागावे लागेल. यापुढच्या कोणत्याही गोष्टींसाठी ब्रिटिशांना दोषी धरता येणार नाही, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

The British can no longer be blamed for developments in the country: Mohan Bhagwat | देशातील घडामोडींसाठी यापुढे ब्रिटिशांना दोष देता येणार नाही : मोहन भागवत

देशातील घडामोडींसाठी यापुढे ब्रिटिशांना दोष देता येणार नाही : मोहन भागवत

googlenewsNext
ठळक मुद्देरा.स्व. संघाचा नवोत्सव कार्यक्रम

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : राजकीय दृष्टीने खंडित असला तरी आपला देश आता स्वतंत्र झाला आहे. आता देशाचे स्वातंत्र्य टिकविणे, राज्य सुचारुपणे चालविणे ही आपली जबाबदारी आहे. यापुढे देशाचे जे काही चांगले वाईट होईल, त्यासाठी आपण जबाबदार असू. गुलाम होतो तेव्हा कसेही वागलेले चालले, आता विचारपूर्वक वागावे लागेल. यापुढच्या कोणत्याही गोष्टींसाठी ब्रिटिशांना दोषी धरता येणार नाही, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.


रा. स्व. संघाच्या नागपूर महानगरच्यावतीने 'नवोत्सव २०२०' हा गुणवत्ता प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम गुरुवारी यशवंत स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला. या अंतर्गत सामूहिक शारीरिक प्रात्यक्षिक व स्पर्धेचेआयोजन करण्यात आले. याप्रसंगी संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी, विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, नागपूर महानगर संघचालक राजेश लोया, महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे आदी उपस्थित होते. यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना डॉ. भागवत म्हणाले, रा. स्व. संघाच्या या गुणवत्ता प्रात्यक्षिक कार्यक्रमातूनच अनुशासन व स्वयंसेवकांमध्ये गुणनिर्मिती होते. संघाच्या या कार्यक्रमातून वैयक्तिक नाही तर सामूहिकतेची भावना वाढते. अनुशासन, भक्ती आणि विवेक जागवून  राष्ट्रबांधणीसाठी कार्य करण्याची भावना या उपक्रमातून होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांची भावना प्रत्यक्ष आचरण करण्याची साधना आहे.  राष्ट्र आणि मानवतेच्या उत्थानासाठी कार्य करण्याची प्रेरणा यातून मिळते. ज्ञान म्हणजे माहितीचा योग्य उपयोग करण्याची दिशा आणि लक्ष्य निर्धारीत करण्याची पद्धत होय. यातून संपूर्ण समाजाला एकत्रित करून विश्वाला मानवता देणारा भारत निर्माण करायचा आहे. समाजात ज्या प्रकारचे परिवर्तन हवे आहे, त्या प्रकारचे आपले आचरण असायला हवे. दैनंदिन जीवनात नागरिकता अनुशासनाचे पालन करणे हीच देशभक्तीची अभिव्यक्ती होय. त्यामुळे नागरिक आणि सामाजिक अनुशासन राखणे ही आपली सवय बनावी. संपूर्ण समाजाचे जीवन व्यवस्थित चालेल या समाजार्पण वृत्तीने कार्य करावे लागेल आणि या आधारावरच आपला देश परमवैभवसंपन्न होईल, अशी भावना डॉ. भागवत यांनी व्यक्त केली.

यावेळी सोमलवाडा भागाच्या तीन गणांनी गणसमानताचे प्रात्यक्षिक सादर केले. मोहिते भागाने नियुद्ध कला, इतवारी भागाने सामूहिक गन समता, लालगंज भागाने पदविन्यास कला, सदर-गिट्टीखदान भागाने योगासन, त्रिमूर्तीनगर भागाने दंड क्रमिक, अयोध्या भागाने योगासन, नंदनवन भागाच्य स्वयंसेवकांनी विनाशस्त्र नियुद्ध कला व अजनी भागाने गीताचे सादरीकरण केले. प्रास्ताविक करताना महानगर संघचालक राजेश लोया यांनी स्पर्धेचे निकाल जाहीर केले. स्पर्धेत प्रथम क्रमांक घोष, द्वितीय नंदनवन भाग व तृतीय क्रमांक धरमपेठ आणि सोमलवाडा भागांनी संयुक्तरीत्या पटकाविला.

Web Title: The British can no longer be blamed for developments in the country: Mohan Bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.