ब्रिटिश दूतावासाचे अधिकारी पोहचले नागपूरच्या गुन्हे शाखेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 11:17 AM2018-02-06T11:17:15+5:302018-02-06T11:17:35+5:30
मानवी तस्करी प्रकरणाच्या तपासासाठी सोमवारी ब्रिटिश दूतावासाचे अधिकारी नागपुरात दाखल झाले. त्यांनी गुन्हे शाखा कार्यालयात जाऊन तपासाची माहिती घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानवी तस्करी प्रकरणाच्या तपासासाठी सोमवारी ब्रिटिश दूतावासाचे अधिकारी नागपुरात दाखल झाले. त्यांनी गुन्हे शाखा कार्यालयात जाऊन तपासाची माहिती घेतली. पोलिसांनी त्यांचे बयानसुद्धा नोंदवून घेतले. याबाबत पोलिसांनी अतिशय गुप्तता पाळली होती.
बोगस दस्तावेजांच्या मदतीने युवकांना ब्रिटनमध्ये पाठविण्यात येते. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत. आतापर्यंत तीन दलालासह ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींना न्यायालयीन तुरुंगात पाठविण्यात आले आहे.
मोठ्या प्रमाणावर ब्रिटनला युवक पाठविण्यात येत असल्याचा ब्रिटिश सरकारला संशय आला. त्यांनी मुंबईतील आपल्या दूतावासाशी संपर्क साधला. त्यांच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास शहर पोलिसांना करण्याची विनंती केली. त्यानुसार शहर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.