छिंदवाडा मार्गावर भीमालगोंडीपर्यंत ब्रॉडगेज तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 11:21 PM2019-03-30T23:21:57+5:302019-03-30T23:24:02+5:30
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर-छिंदवाडा ब्रॉडगेजवर छिंदवाडा ते भंडारकुंड हे ३५ किलोमीटरचे आणि इतवारी ते केळवदपर्यंत ४८ किलोमीटरचे ब्रॉडगेजचे काम पूर्ण झाले. त्यामुळे या मार्गावर रेल्वेगाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. त्यानंतर केळवद ते भीमालगोंडी हे ४४ किलोमीटर ब्रॉडगेजचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर रेल्वेगाड्या चालविण्यासाठी सीआरएसद्वारे मंजुरी मिळाली असून लवकरच या मार्गावर रेल्वेगाड्या सुरु करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्यानागपूर-छिंदवाडा ब्रॉडगेजवर छिंदवाडा ते भंडारकुंड हे ३५ किलोमीटरचे आणि इतवारी ते केळवदपर्यंत ४८ किलोमीटरचे ब्रॉडगेजचे काम पूर्ण झाले. त्यामुळे या मार्गावर रेल्वेगाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. त्यानंतर केळवद ते भीमालगोंडी हे ४४ किलोमीटर ब्रॉडगेजचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर रेल्वेगाड्या चालविण्यासाठी सीआरएसद्वारे मंजुरी मिळाली असून लवकरच या मार्गावर रेल्वेगाड्या सुरु करण्यात येणार आहे.
नागपूर-छिंदवाडा मार्गावर मागील चार वर्षांपासून नॅरोगेज लाईनच्या ठिकाणी ब्रॉडगेज लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. या कामात नागपूर ते केळवदपर्यंत ब्रॉडगेजचे काम पूर्ण झाल्यामुळे ब्रॉडगेज रेल्वेगाडी सुरु करण्यात आली आहे. त्यानंतर आता केळवद ते भीमालगोंडी ४४ किलोमीटरचे ब्रॉडगेजचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर रेल्वे वाहतुकीसाठी मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच ब्रॉडगेज रेल्वेगाडी सुरु करण्यात येणार आहे. छिंदवाडा मार्गावर केवळ भंडारकुंड ते भीमालगोंडी २२ किलोमीटर ब्रॉडगेजचे काम अपूर्ण असून ते लवकरच पूर्ण करण्यात येत असल्याचे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने कळविले आहे. भीमालगोंडीपर्यंत ब्रॉडगेजचे काम पूर्ण झाल्यामुळे आता सावंगा, पारडसिंगा, लोधीखेडा, बेरडी, सौंसर, रामाकोना, देवी, डेला येथील प्रवाशांसाठी मोठी सुविधा झाली असून यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.