वर्धा व भंडारा दूरदर्शन केंद्रांचे प्रसारण लवकरच बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 10:36 AM2018-03-01T10:36:01+5:302018-03-01T10:36:11+5:30
अॅनालॉग टेरिस्ट्रियल टीव्ही ट्रान्समिशनच्या डीडी नॅशनल चॅनल व प्रादेशिक वाहिनीअंतर्गत आर्वी (चॅनल ११), पुलगाव (चॅनल २७), वर्धा (चॅनल ३१) व भंडारा (चॅनल ११) या दूरदर्शन केंद्राचे प्रसारण लवकरच बंद होणार असून, संबंधित केंद्राची सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अॅनालॉग टेरिस्ट्रियल टीव्ही ट्रान्समिशनच्या डीडी नॅशनल चॅनल व प्रादेशिक वाहिनीअंतर्गत आर्वी (चॅनल ११), पुलगाव (चॅनल २७), वर्धा (चॅनल ३१) व भंडारा (चॅनल ११) या दूरदर्शन केंद्राचे प्रसारण लवकरच बंद होणार असून, संबंधित केंद्राची सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार नाही.
हे चॅनल्स डीडी फ्री डिश डायरेक्ट टू होम (डीटीएच) यावर इतर चॅनल्ससोबत उपलब्ध आहेत. त्यासाठी आवश्यक उपकरणे सेटटॉप बॉक्स, डिश अॅन्टिना आणि इतर उपकरणे बाजारात उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी जवळच्या दूरदर्शन कार्यालयात किंवा दूरदर्शनच्या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन दूरदर्शन नागपूर केंद्राच्या अभियांत्रिकी विभागाचे संचालक अधीर गडपाले यांनी केले आहे.