क्षुल्लक कारणावरून सख्ख्या भावाला चाकू मारून केले जखमी
By दयानंद पाईकराव | Updated: January 2, 2024 13:40 IST2024-01-02T13:39:31+5:302024-01-02T13:40:11+5:30
आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती तहसिल पोलिसांनी दिली.

क्षुल्लक कारणावरून सख्ख्या भावाला चाकू मारून केले जखमी
दयानंद पाईकराव, नागपूर : क्षुल्लक कारणावरून आईवडिलांशी भांडण केल्यानंतर मोठ्या भावाच्या घरातील सामान फेकून त्याला चाकु मारून गंभीर जखमी करणाऱ्या आरोपीविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रोहित उर्फ मारी नामदेव चांदेकर (वय २८, रा. खिरणी, हनुमान मंदिराजवळ, शिवाजीनगर) असे हल्ला केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर विक्की नामदेव चांदेकर (वय ३२, रा. लाकडीपुलाजवळ, तेलीपुरा) असे गंभीर जखमी झालेल्या मोठ्या भावाचे नाव आहे.
रविवारी ३१ डिसेंबरला रात्री ११.१५ वाजता आरोपी रोहित हा विक्की चांदेकर यांच्या घरी आला. त्याने आईवडिलांसोबत वाद घालून घरातील सामान फेकणे सुरु केले. विक्की यांनी सामान का फेकत आहे, अशी विचारना केली असता आरोपीने त्यांच्यासोबत भांडण करून हाताबुक्क्यांनी मारहाण करून आपल्या जवळील चाकुने विक्की यांच्या हातावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेला. विक्की यांच्यावर मेडिकलमध्ये उपचार करण्यात आले. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून तहसिल पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक श्याम सोनपराते यांनी आरोपी रोहितविरुद्ध कलम ३२६, ३२३, ५०४ नुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे. आरोपी रोहित हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती तहसिल पोलिसांनी दिली.