ऑटाेत विसरलेली पैशाची पर्स घरी नेऊन दिली ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:18 AM2021-01-08T04:18:05+5:302021-01-08T04:18:05+5:30
नागपूर : संत्रानगरीचे ऑटाेचालक त्यांच्या प्रामणिकपणाठीही ओळखले जातात. ऑटाेचालकांच्या प्रामाणिकपणाची अनेक उदाहरणे समाजासमाेर येत असतात. बुधवारी असाच एक ...
नागपूर : संत्रानगरीचे ऑटाेचालक त्यांच्या प्रामणिकपणाठीही ओळखले जातात. ऑटाेचालकांच्या प्रामाणिकपणाची अनेक उदाहरणे समाजासमाेर येत असतात. बुधवारी असाच एक प्रसंग बघायला मिळाला. माेहम्मद रफिक असे या ऑटाेचालकाचे नाव आहे. एका प्रवाशाने ऑटाेत विसरलेली पैशाने भरलेली पर्स रफिक यांनी प्रवाशाच्या घरी जाऊन परत केली. त्यांचा प्रामाणिकपणा चर्चेचा विषय ठरला.
भारतीय मजदूर संघाचे विदर्भ प्रांत संघटनमंत्री रमेश पाटील गाेंदिया येथे झालेली संघटनेची बैठक पूर्ण करून मंगळवारी रात्री १० वाजता नागपूर रेल्वे स्टेशनवर पाेहचले. त्यांच्या काेराडी काॅलनी येथील घरी जाण्यासाठी स्टेशनवरून माेहम्मद रफिक यांच्या ऑटाेत बसले. घरी पाेहचल्यानंतर खिशातून पाकीट काढून त्यातील पैसे ऑटाेचालकाला दिले. गडबडीत त्यांनी त्यांचे पाॅकीट ऑटाेतच विसरले. दरम्यान घरी प्रवेश केल्यानंतर कार्ड काढण्यासाठी खिसा तपासला तेव्हा त्यांचे पाकीट नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांना धक्काच बसला. कारण पर्समध्ये नगदी ५००० रुपयांसह क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड, अधार कार्ड, पॅन कार्ड व इतर महत्त्वाची कागदपत्रे हाेती. दुसऱ्या दिवशी याबाबत पाेलिसांना तक्रार करण्यापूर्वी ते भारतीय मजदूर संघाच्या कार्यालयात गेले. याचदरम्यान त्यांना त्यांच्या शेजारील व्यक्तीचा फाेन आला. ज्या ऑटाेचालकाने त्यांना घरी साेडले हाेते, ताे घरी आल्याचे त्यांनी सांगितले. हे ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. पाटील यांच्या सांगण्यावरून शेजाऱ्यांनी ऑटाेचालकाला संघटनेच्या कार्यालयात पाठविले. कार्यालयात पाेहचून रफिक यांनी पाटील यांची पर्स त्यांना साेपविली. त्यांचा हा प्रामाणिकपणा पाहून रमेश पाटील यांनाही हायसे वाटले. त्यांचे पाकीट सीट काॅर्नरला पडले राहिल्याचे रफिक यांनी सांगितले. पाटील यांनी रफिक यांना पैसे देण्याची इच्छा व्यक्त केली पण रफिक यांनी नकार दिला. नंतर सर्वांच्या आग्रहाखातर त्यांनी स्वीकार केला. यादरम्यान संघटनमंत्री सुरेश चौधरी, गजानन गटलेवार, प्रमोद काली आदी पदाधिकाऱ्यांनी रफिक यांचा सत्कार केला.