बीआरएसपीचे सुरेश मानेंनी केले शक्तिप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 11:16 PM2019-04-09T23:16:23+5:302019-04-09T23:17:28+5:30
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी आणि विदर्भ निर्माण महामंचचे नागपूर लोकसभेचे उमेदवार अॅड सुरेश माने यांनी झंझावाती प्रचार केला. दक्षिण नागपुरातील प्रचार कार्यालयातून सकाळी ९ वाजता त्यांच्या प्रचार रॅलीला सुरुवात झाली. निळे झेंडे, प्रचाररथ, दुचाकीवर स्वार कार्यकर्त्यांनी वेगळा विदर्भ झालाच पाहिजेच्या घोषणा देऊन रॅलीद्वारे शहरभर प्रचार केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी आणि विदर्भ निर्माण महामंचचे नागपूर लोकसभेचे उमेदवार अॅड सुरेश माने यांनी झंझावाती प्रचार केला. दक्षिण नागपुरातील प्रचार कार्यालयातून सकाळी ९ वाजता त्यांच्या प्रचार रॅलीला सुरुवात झाली. निळे झेंडे, प्रचाररथ, दुचाकीवर स्वार कार्यकर्त्यांनी वेगळा विदर्भ झालाच पाहिजेच्या घोषणा देऊन रॅलीद्वारे शहरभर प्रचार केला.
बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी आणि विदर्भ निर्माण महामंचचे नागपूर लोकसभेचे उमेदवार अॅड सुरेश माने यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचाररथ, दुचाकी, आॅटोवर पक्षाचे झेंडे घेऊन बीआरएसपी जिंदाबाद, अॅड सुरेश माने तुम आगे बढो, बीआरएसपी आयी है, नयी रोशनी लायी है, वेगळा विदर्भ झालाच पाहिजेच्या घोषणा दिल्या. रॅली म्हाळगीनगर, गजानननगर, महाकालीनगर, बेलदारनगर, वैभवनगर, दिघोरी, वाठोडा, खरबी चौक, हिवरीनगर, पडोळेनगर, शास्त्रीनगर, नंदनवन, मोठा ताजबाग, डायमंडनगर, भांडेप्लॉट, सक्करदरा झोपडपट्टी, अयोध्यानगर, नवीन सुभेदार, आशीर्वादनगर, संजयनगर, वैष्णोमातानगर, सिद्धेश्वरनगर, भोले बाबानगर, उदयनगर, जानकीनगर, आकाशनगर, ज्ञानेश्वरनगर, जुना सुभेदार, महात्मा फुलेनगर, रिपब्लिकन वसाहत, भगवाननगर या मार्गाने काढण्यात आली. मानेवाडा येथे रॅलीचा समारोप झाला. रॅलीत कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणा देऊन अॅड सुरेश माने यांच्या एअर कंडीशनर या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रा. रमेश पिसे, दिनकर वाठोरे, संतोष ठवरे, दादा हटवार, राहुल सुर्यवंशी, श्रीराम कोसे, अॅड वासुदेव वासे, अॅड विकास गणवीर, प्रेमकुमार म्हैसकर, पुरुषोत्तम कामडी, संजय हटवार, हरिकिशन हटवार, मनोज गजभिये, सत्यविजय गोंडाणे, लक्ष्मण खोब्रागडे, सौरभ गाणार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.