नागपुरातील एमआयडीसी भागात गुन्हेगाराचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 02:22 PM2018-05-05T14:22:47+5:302018-05-05T14:23:06+5:30

रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर रोडवर फिरायला गेलेल्या तरुणाचा डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. त्याचा मृतदेह एमआयडीसी परिसरातील नागपूर-हिंगणा मार्गावरील आयसी चौकात आढळून आला. ही घटना गुरुवारी रात्री घडली असून, शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. यातील एकाच्या भावाच्या खुनात मृत तरुणाचा सहभाग असल्याने त्याने बदला घेण्यासाठी त्याचा खून केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

Brutal murder of criminal in the MIDC areas of Nagpur | नागपुरातील एमआयडीसी भागात गुन्हेगाराचा निर्घृण खून

नागपुरातील एमआयडीसी भागात गुन्हेगाराचा निर्घृण खून

Next
ठळक मुद्देतीन संशयितांना घेतले ताब्यात : भावाच्या हत्येचा बदला घेतल्याचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर रोडवर फिरायला गेलेल्या तरुणाचा डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. त्याचा मृतदेह एमआयडीसी परिसरातील नागपूर-हिंगणा मार्गावरील आयसी चौकात आढळून आला. ही घटना गुरुवारी रात्री घडली असून, शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. यातील एकाच्या भावाच्या खुनात मृत तरुणाचा सहभाग असल्याने त्याने बदला घेण्यासाठी त्याचा खून केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
श्रीकांत रमेश गुहे (२३, रा. राजगृहनगर, हिंगणा रोड, नागपूर) असे मृताचे नाव असून, पोलिसांनी पंकज अंबादे याच्यासह अन्य दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. श्रीकांतने गुरुवारी रात्री घरी जेवण केले आणि फिरायला बाहेर गेला. त्यानंतर तो घरी परतला नाही. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ‘मॉर्निंग वॉक’ला गेलेल्या नागरिकांना त्याचा मृतदेह आयसी चौकात रोडच्या कडेला पडला असल्याचे निदर्शनास आले.
पंकज अंबादे यांचा भाऊ अमित याच्या खूनप्रकरणात अजनी (नागपूर) पोलिसांनी श्रीकांतला अटक केली होती. त्यानंतर त्याची नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. तो काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून जामिनावर बाहेर आला होता. याची माहिती पंकजला होती. त्याला त्याच्या भावाच्या खुनाचा बदला घ्यावयाचा होता.
श्रीकांत बाहेर दिसताच पंकज व त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलिसांनी पंकज व त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले आहे. त्याच्या साथीदारांची नावे कळू शकली नाहीत.
नागरिकांनी या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला व उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा येथील शासकीय रुग्णालयात पाठविला.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी भादंवि ३०२, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला असून, या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. डेहनकर करीत आहेत.
खूनप्रकरणात अटक
श्रीकांत हा गांजा विक्री करायचा. त्याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गांजा विक्री व खुनाचे दोन गुन्हे दाखल आहेत. अजनी (नागपूर) पोलिसांनी त्याला वर्षभरापूर्वी अमित अंबादे यांच्या खूनप्रकरणात अटक केली होती. तो काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आला होता.

Web Title: Brutal murder of criminal in the MIDC areas of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.