बीएसएनएलच्या सेवा आता आऊटसोर्सिंगद्वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 10:38 AM2020-03-03T10:38:28+5:302020-03-03T10:39:34+5:30
भारतीय दूरसंचार निगम लि.(बीएसएनएल)तर्फे देण्यात येणारी दूरध्वनी सेवा खासगी लोकांच्या हातात जाणार आहे. कनेक्शनमध्ये येणारी समस्या, रखरखाव व देखभालीची जबाबदारी खासगी कंत्राटदारांना सोपविण्यात येणार आहे.
वसीम कुरैशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय दूरसंचार निगम लि.(बीएसएनएल)तर्फे देण्यात येणारी दूरध्वनी सेवा खासगी लोकांच्या हातात जाणार आहे. कनेक्शनमध्ये येणारी समस्या, रखरखाव व देखभालीची जबाबदारी खासगी कंत्राटदारांना सोपविण्यात येणार आहे.
रस्त्याचे रुंदीकरण, नवीन फ्लायओव्हर, मेट्रो ट्रेन व पुलाच्या बांधकामामुळे बीएसएनएलची दूरसंचार सेवा उद्ध्वस्त झाल्यासारखी आहे. त्यामुळे अनेक कनेक्शन बंद पडलेले आहे. कर्मचाऱ्यांना ग्राहकाच्या संतापाचे बळी पडावे लागत आहे. त्यामुळे बीएसएनएलची सेवा खासगी कंत्राटदाराच्या हातात जाण्याचा मानस आहे. खासगीकरणामुळे वित्तीय स्थितीत सुधार होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नियमित कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या रुपात ७० ते ७५ टक्के महसूल खर्च होतो आहे.
खासगीकरणामुळे हा खर्च ३५ टक्के कमी होणार आहे. अधिकाºयांकडून मिळालेल्या माहितीनुसार सेवानिवृत्तीनंतर नवीन जागा भरण्यावर बंधने आली आहेत. कर्मचाºयांची संख्या घटत चालली आहे. बीएसएनएलला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी मंत्रालयाला सरकारी कार्यालयात किमान एक बीएसएनएलचे कनेक्शन देण्यात यावे, अशी विनंती केली होती. परंतु त्याचे सकारात्मक परिणाम आले नाही. मात्र बीएसएनएलच्या धोरणामध्ये होत असलेल्या बदलामुळे येत्या चार ते सहा महिन्यात वित्तीय स्थितीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे.
लवकरच चांगल्या स्थितीत येईल बीएसएनएल
आतापर्यंत बीएसएनएलचा जो खर्च होता त्यातून ७० ते ७५ टक्के वेतनावर खर्च होत होता. नवीन संकल्पना अंमलात आणण्यात येणार असल्याने ४ ते ६ महिन्यात बीएसएनएल पुन्हा चांगल्या स्थितीत येईल.
- एस. व्ही. खरे, जनसंपर्क अधिकारी, बीएसएनएल, नागपूर
१.५० कोटीचे वीज बिल थकीत
बीएसएनएल (नागपूर) च्या कार्यालयावर किमान दीड कोटी रुपये वीज बिलाचे थकीत आहे. आर्थिक स्थिती बिघडल्याने गेल्या ६ महिन्यापासून बिल भरण्यात आले नाही. बीएसएनएलला सध्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो आहे. कर्मचाºयांचे वेतन, भत्ते थांबविण्यात आल्याने, कर्मचाºयांनी आंदोलन केले होते. व्यवस्थापनाचे दूर्लक्ष झाल्यामुळे वीज बिलाबरोबरच अनेक कामांची देयके थकित आहे.