महापौर कक्षापुढे बसपाचे धरणे ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:08 AM2021-07-08T04:08:15+5:302021-07-08T04:08:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : यशवंत स्टेडियमवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव २९ वर्षांपासून प्रलंबित आहे. यासह शहरातील ...

BSP holding in front of mayor's office () | महापौर कक्षापुढे बसपाचे धरणे ()

महापौर कक्षापुढे बसपाचे धरणे ()

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : यशवंत स्टेडियमवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव २९ वर्षांपासून प्रलंबित आहे. यासह शहरातील विविध प्रलंबित प्रकल्प मार्गी लागावे, यासाठी बुधवारी बसपा नगरसेवकांनी व कार्यकर्त्यांनी पक्षाचे गटनेते जितेंद्र घोडेस्वार यांच्या नेतृत्वात महापौर कक्षापुढे धरणे दिली. नगरसेवक वंदना राजू चांदेकर, वैशाली अविनाश नारनवरे, इब्राहिम तोफीक मोहम्मद, मंगला योगीराज लांजेवार, संजय भुरेवार, नरेंद्र वालदे, विरंका मुरलीधर भिवगडे, ममता महेश सहारे आदींचा समावेश होता.

महापौर दयाशंकर तिवारी व अतिरिक्त आयुक्त जोशी यांनी बसपाचे निवेदन स्वीकारले. महापौरांनी प्रमुख मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे,नगरसेवक मनोज सांगोळे उपस्थित होते.

आंदोलनात प्रदेश बसपाचे महासचिव नागोराव जयकर, प्रदेश कार्यालयीन सचिव उत्तम शेवडे, जिल्हा प्रभारी नितीन शिंगाडे, विजय डहाट, विलास सोमकुवर, इंजिनिअर राजीव भांगे, योगेश लांजेवार, राजू चांदेकर, गौतम पाटील, सदानंद जामगडे, प्रवीण पाटील, सुरेंद्र डोंगरे, आदाब खान, प्रणय मेश्राम, सुबोध गणवीर, सतीश पानेकर, सुबोध साखरे, परेश जामगडे आदींचा सहभाग होता.

...

अशा आहेत मागण्या

-यशवंत स्टेडियमवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्यात यावे.

-अंबाझरी येथील डॉ. आंबेडकर सांस्कृतिक केंद्राचे पुनर्निर्माण करावे.

-मेडिकल चौकात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुर्णाकृती पुतळा व स्मारक उभारावा.

-कांशीराम टी पॉइंट व कांशीराम मार्गावरील मेट्रो स्टेशनला कांशीराम यांचे नाव द्यावे.

-सेंट्रल जेल मार्गावरील मेट्रो स्टेशनला दीक्षाभूमी नाव द्यावे.

Web Title: BSP holding in front of mayor's office ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.