जन्मशताब्दी भवनासाठी बसपाचा इशारा

By admin | Published: September 15, 2016 02:54 AM2016-09-15T02:54:10+5:302016-09-15T02:55:42+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी भवनाचे काम सुरूव्हावे, यासाठी बसपाने संविधान चौकात धरणे आंदोलन करीत शासनाला अंतिम इशारा दिला.

BSP warning for birth centenary | जन्मशताब्दी भवनासाठी बसपाचा इशारा

जन्मशताब्दी भवनासाठी बसपाचा इशारा

Next

तातडीने काम सुरू करण्याची मागणी : संविधान चौकात धरणे
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी भवनाचे काम सुरूव्हावे, यासाठी बसपाने संविधान चौकात धरणे आंदोलन करीत शासनाला अंतिम इशारा दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नागपूर महानगरपालिकेने यशवंत स्टेडियम समोरील पटवर्धन मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन (शोध केंद्र) बांधण्याचा प्रस्ताव ३१ डिसेंबर १९९२ रोजी एकमताने मंजूर केला होता.
हे सभागृह पाच हजार प्रेक्षक क्षमतेचे व आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व ग्रंथालय तसेच व्हीआयपी व व्हीव्हीआयपींचे कार्यक्रम होतील असा प्रस्ताव आहे. त्याला २५ वर्षे लोटली आहेत. दरम्यान काँग्रेस १५ व भाजप १० वर्षांपासून सत्तेत आहे. परंतु आंबेडकर स्मारकच्या नावाने एक वीटही लावली नाही. यासंदर्भात अनेक संघटनांनी वेळोवेळी निवेदने दिली. आंदोलने केली परंतु काम सुरू झाले नाही. त्यामुळे बसपाने बुधवारी धरणे आंदोलन करीत या विषयावर शासनाला अंतिम इशारा दिला आहे. या विषयावर राज्यभरात आंदोलन पेटवण्यात येणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले. महापौर व मनपा आयुक्तांना मागणीचे निवेदनही सादर करण्यात आले.
धरणे आंदोनात बसपाचे उपाध्यक्ष कृष्णा बेले, प्रदेश प्रभारी प्रेम रोडेकर, जितेंद्र म्हैसकर, सागर डबरासे, विश्वास राऊत, उत्तम शेवडे, रमेश लोखंडे, राजेंद्र पडोळे, विवेक हाडके, पृथ्वीराज शेंडे, नरोगाव जयकर, राजकुमार बोरकर, मनपा गटनेते गौतम पाटील, रूपेश बागेश्वर, कविता लांडगे, सागर लोखंडे, मनीषा घोडेस्वार, किरण पाटणकर, अभिषेक शंभरकर, रोहित वालदे, कपिल राऊत, हर्षवर्धन डोईफोडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: BSP warning for birth centenary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.