बुद्ध धम्म ही भारताने जगाला दिलेली अमूल्य भेट : किरण रिजीजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 09:40 PM2019-10-09T21:40:14+5:302019-10-09T21:42:08+5:30

तथागत बुद्धांनी दिलेला शांती, मैत्री, करुणेचा संदेश हा संपूर्ण जगाने स्वीकारलेला आहे. त्यामुळे तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म ही भारताने जगाला दिलेली अमूल्य अशी भेट आहे, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) यांनी येथे केले.

The Buddha Dhamma is the most precious gift India has given to the world: Kiran Rijiju | बुद्ध धम्म ही भारताने जगाला दिलेली अमूल्य भेट : किरण रिजीजू

ड्रॅगन पॅलेस येथील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात मुख्य अतिथ केंद्रीय राज्यमंत्री किरण रिजजू, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सुलेखा कुंभारे

Next
ठळक मुद्देड्रॅगन पॅलेस येथील धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तथागत भगवान बुद्ध यांचा जन्म भारतात झाला असला तरी तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचार हे संपूर्ण जगाने अंगीकृत केले आहे. तथागत बुद्धांनी दिलेला शांती, मैत्री, करुणेचा संदेश हा संपूर्ण जगाने स्वीकारलेला आहे. त्यामुळे तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म ही भारताने जगाला दिलेली अमूल्य अशी भेट आहे, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) यांनी येथे केले.
कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख व राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्या अ‍ॅड. सुलेखा कुंभारे होत्या. तर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख अतिथी होते. तसेच म्यानमारचे बौद्ध उपासक टेंग ग्यार, थायलंडचे पूज्य भदंत डॉ. परमहा अनेक, तायवानचे शीना हसू, बांग्लादेशचे सुगत आदी प्रामख्याने उपस्थित होते.
ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे अतिशय सुंदर असे जागतिक दर्जाचे धम्म बुद्ध विहार आहे. येथे आल्यानंतर मानवाला शांती व समाधान प्राप्त होत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
यावेळी आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट थीम पार्क कन्व्हेंशन सेंटरच्या संकेत स्थळाचे लोकार्पण तसेच सेव्हन वंडर्स आॅफ बुद्धिस्ट वर्ल्ड या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन केंद्रीय राज्यमंत्री किरण रिजीजू यांच्या हस्ते करण्यात आले.
रिजीजू यांनी सर्वप्रथम ड्रॅगन पॅलेस टेंम्ल परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र येथील डॉ. आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच विपश्यना मेडिटेशन सेंटरची सुद्धा पाहणी केली.
प्रास्ताविक डांगे गुरुजी यांनी केले. संचालन वंदना भगत यांनी केले. तर दीपंकर गणवीर यांनी आभार मानले.
यावेळी अजय कदम, नंदा गोडघाटे, सुुभाष सोमकुवर, उदास बन्सोड, नियाज कुरेशी, नितीन गजभिये, अशपाक कुरेशी, रेखा भवे, प्रवीण निखाडे, दीपक सिरीया, राजू भागवत, मनोहर गणवीर, नारायण नितनवरे, सावला सिंगाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

 

 

Web Title: The Buddha Dhamma is the most precious gift India has given to the world: Kiran Rijiju

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.