Budget 2019 : वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाला ३५० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 12:30 AM2019-02-02T00:30:09+5:302019-02-02T00:30:54+5:30

वित्त आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी लोकसभेत सादर केलेल्या बजेटमध्ये रेल्वेचे जाळे मजबूत बनविण्यावर भर दिला आहे. त्यामुळे विदर्भातील विविध रेल्वे प्रकल्पांना भरघोस निधी मिळाला आहे. यात महत्त्वाच्या २७० किलोमिटर लांबीच्या वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड रेल्वे लाईनसाठी २०१९-२० साठी ३५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या मार्गाला गती देण्यासाठी लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच दरवर्षी या प्रकल्पासाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात येत असून या अर्थसंकल्पातही ३५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

Budget 2019: Wardha-Yavatmal-Nanded railway route has 350 crores | Budget 2019 : वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाला ३५० कोटी

Budget 2019 : वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाला ३५० कोटी

googlenewsNext
ठळक मुद्देविदर्भातील प्रकल्पांना भरघोस निधी : बडनेरा वर्कशॉपसाठी १५१.६३ कोटीची तरतूद

दयानंद पाईकराव/आनंद शर्मा/लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वित्त आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी लोकसभेत सादर केलेल्या बजेटमध्ये रेल्वेचे जाळे मजबूत बनविण्यावर भर दिला आहे. त्यामुळे विदर्भातील विविध रेल्वे प्रकल्पांना भरघोस निधी मिळाला आहे. यात महत्त्वाच्या २७० किलोमिटर लांबीच्या वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड रेल्वे लाईनसाठी २०१९-२० साठी ३५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या मार्गाला गती देण्यासाठी लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच दरवर्षी या प्रकल्पासाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात येत असून या अर्थसंकल्पातही ३५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
वर्धा-यवतमाळ-नांदेड या प्रकल्पाशिवाय बडनेरातील रेल्वे वर्कशॉपसाठी १५१ कोटी ६३ लाख ७२ हजार रुपये देण्यात आले आहेत. ७८.७० किलोमीटर लांबीच्या वर्धा-नागपूर चौथ्या लाईनसाठी १३५ कोटी रुपये, ७६.३ किलोमीटर लांबीच्या वर्धा-नागपूर थर्ड लाईनसाठी ११० कोटी, १३२ किलोमीटर लांबीच्या वर्धा-बल्लारशाह थर्ड लाईनसाठी १६० कोटी रुपये, इटारसी-नागपूर थर्ड लाईनसाठी १८५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. अर्थसंकल्पात अमरावती रेल्वेस्थानकावर नवी टर्मिनल इमारत तयार करण्याची घोषणा करण्यात आली असून प्राथमिक स्तरावर त्यासाठी केवळ एक हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर १६५ किलोमीटर लांबीच्या राजनांदगाव-नागपूर थर्ड लाईनच्या कामासाठी ३५० कोटी रुपये, १४९.५२ किलोमीटर लांबीच्या छिंदवाडा-नागपूर ब्रॉडगेज लाईनसाठी १२५ कोटी रुपये मिळाले आहेत. ४९.५ किलोमीटर लांबीच्या वडसा-गडचिरोली रेल्वेलाईनसाठी २९.९० कोटी रुपये देण्यात आले आहे. गोंदिया-जबलपूर (बालाघाट, कटंगीसह) रेल्वे लाईनसाठी १२५ कोटी रुपये, छिंदवाडा-मंडला फोर्ट रेल्वे लाईनसाठी १५० कोटी रुपये, गोंदिया येथील डेमू शेडसाठी १.१६ कोटी, वर्धा रेल्वेस्थानकावर प्लॅटफार्मवर वॉशेबल अ‍ॅप्रानसाठी ५० लाख रुपये, तिगाव-चिचोंडा थर्ड घाट लाईनसाठी ३५ कोटी रुपये, वर्धा-चितोडा सेकंड कॉर्ड लाईनसाठी १ कोटी रुपये, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील ५० रेल्वे गेटवर रिमोट टर्मिनल व ईएलडी इक्विपमेंट सिस्टीमसाठी ४ कोटी रुपये, १५ रेल्वे गेटवर इंटरलॉकिंगसाठी ८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Web Title: Budget 2019: Wardha-Yavatmal-Nanded railway route has 350 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.