कन्हान येथे सार्वजनिक शाैचालयाचे बांधकाम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:14 AM2021-03-04T04:14:53+5:302021-03-04T04:14:53+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : तालुक्यातील माेठी व जुनी कन्हान नगरपरिषद आहे. परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून येथे सार्वजनिक सुलभ ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : तालुक्यातील माेठी व जुनी कन्हान नगरपरिषद आहे. परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून येथे सार्वजनिक सुलभ शाैचालय बांधण्यात आले नाही. त्यामुळे नगरपरिषद हद्दीतील रिकाम्या जागेवर सार्वजनिक सुलभ शाैचालयाचे बांधकाम करण्यात यावे, या मागणीसाठी नागरिकांनी नगराध्यक्ष करुणा आष्टनकर यांच्याकडे नुकतेच निवेदन साेपविले आहे.
कन्हान शहरात सुलभ शाैचालय व्हावे, यासाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटना तसेच ज्येष्ठ नागरिकांनी अनेकदा मागणी रेटून धरली हाेती. आता नगरपरिषदेला सार्वजनिक सुलभ शाैचालय बांधकाम करण्याकरिता शासनाच्या वतीने निधी उपलब्ध करण्यात आला आहे. यासाठी नगरपरिषद हद्दीत विविध ठिकाणी रिक्त जागा उपलब्ध आहे. शासनाचा निधी परत न जाता शहरातील गांधी चाैकातील जुन्या ओसाड काेंडवाड्याची जागा किंवा नगरपरिषद कार्यालयाच्या बाजूच्या परिसरात अनेक जागा रिक्त आहे, या ठिकाणी सार्वजनिक सुलभ शाैचालयाचे बांधकाम केल्यास नागरिकांना सुविधा हाेईल, अशी मागणी नवयुवक संघर्ष समितीने नगराध्यक्ष करुणा आष्टनकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी प्रशांत मसार, रवींद्र दुपारे, नरेंद्र बेले, अमोल साकोरे, विनोद येलमुले, नितीन मेश्राम, माधव काठोके, प्रदीप बावणे, राजेश क्षत्रिय, अभिषेक आकरे, अजय चव्हाण, वृषभ बावणकर, भरत पगारे, विलास शेंडे, विपीन गोंडाणे, दीपक तिवाडे, चंदन मेश्राम, पंकज गजभिये, गणेश भालेकर, कुंदन रामगुडे, शिवशंकर भोयर, सोनू मसराम आदी उपस्थित हाेते.