नागपूर रेल्वेस्थानकात साकारली बुलंद आर्ट गॅलरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 11:01 AM2018-02-16T11:01:09+5:302018-02-16T11:02:21+5:30

नागपूर रेल्वेस्थानकावर विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांच्या संकल्पनेतून बुलंद आर्ट गॅलरी साकारण्यात आली असून ही गॅलरी प्रवाशांना पाहण्यासाठी नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे.

The Buland Art Gallery in Nagpur Railway Station | नागपूर रेल्वेस्थानकात साकारली बुलंद आर्ट गॅलरी

नागपूर रेल्वेस्थानकात साकारली बुलंद आर्ट गॅलरी

Next
ठळक मुद्दे‘डीआरएम’ची संकल्पना रेल्वेस्थानकाच्या सौंदर्यात भर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांच्या संकल्पनेतून बुलंद आर्ट गॅलरी साकारण्यात आली असून ही गॅलरी प्रवाशांना पाहण्यासाठी नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे.
बुलंद आर्ट गॅलरीत रेल्वे कोचच्या चार प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. यात रेल्वे इंजिनसोबत प्लॅटफॉर्मवर गाडीचे आगमन, फुट ब्रीज, रेल्वेगाडी जाताना आदींचा समावेश आहे. दीक्षाभूमीची कलाकृतीही हुबेहुब साकारण्यात आली आहे. या कलाकृती चित्रकार विजय बिसवाल यांनी साकारल्या आहेत. बिसवाल यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात उल्लेख केला होता. बुलंद आर्ट गॅलरीत महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने सात ग्लो साईन डिस्प्ले बोर्ड आणि आठ पोस्टर प्रदर्शित केले आहेत. पुरातन मंदिर जसे रामटेक गड मंदिर, गोंदिया येथील बोधलकसा नैसर्गिक सुंदर लेक, चंद्रपूर येथील ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्ह, पेंच राष्ट्रीय उद्यान, वर्धा येथील बोर टायगर रिझर्व्ह, नागपुरातील गणेश मंदिर आदींचा समावेश आहे. साईन बोर्डात कामठी येथील ड्रॅगन पॅलेस, गोंदिया येथील नवेगाव राष्ट्रीय उद्यान, अकोला येथील नरनारा फोर्ट, गडचिरोली येथील भामरागड, सेवाग्राम येथील बापुकुटी, गडचिरोलीतील मार्कण्डा मंदिर आदींचा समावेश आहे. या कलाकृतींमुळे नागपूर रेल्वेस्थानकाच्या सुंदरतेत आणखी भर पडली आहे.

Web Title: The Buland Art Gallery in Nagpur Railway Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.