Buldana Bus Accident : बस चालकाला डुलकी लागली अन् २५ प्रवाशांचा होरपळून जीव गेला 

By सुमेध वाघमार | Published: July 1, 2023 04:49 PM2023-07-01T16:49:56+5:302023-07-01T16:49:56+5:30

८०च्या वेगात असलेली १५ टनची बस दुभाजकला धडकली. बसचा ‘एक्सल’ तुटला व याचवेळी बस डाव्या बाजुला कलंडली

Buldana Bus Accident : The bus driver fell asleep and 25 passengers lost their lives | Buldana Bus Accident : बस चालकाला डुलकी लागली अन् २५ प्रवाशांचा होरपळून जीव गेला 

Buldana Bus Accident : बस चालकाला डुलकी लागली अन् २५ प्रवाशांचा होरपळून जीव गेला 

googlenewsNext

नागपूर : विदर्भ ट्रॅव्हल्स बसने समृद्धी महामार्गावर १५२ किलोमीटरचे अंतर कापल्यावर चालकाला डुलकी लागली. बस पोलला धडकली. नंतर रस्ता दुभाजकाला धडक देऊन बस डाव्या बाजूने कलंडत २५ मीटरपर्यंत घासत गेली. बसच्या घर्षणाने इंजिन ऑईलने आणि नंतर डिझेलने पेट घेतला आणि बसमधील २५ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला, असा निष्कर्ष अमरावती आरटीओने काढला. 

भीषण अपघात झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सची ‘एमएच २९ बीई १८१९’ क्रमांकाचा बसला १० मार्च २०२४ पर्यंतचे फिटनेस सर्टिफिकेट प्राप्त आहे. अमरावती ‘आरटीओ’चा निष्कर्षानुसार, ही बस सायंकाळी ५ वाजता नागपूरहून निघाली. वर्धा, यवतमाळ, दाराव्हा होऊन कारंजाला आली. रात्री ११ वाजून ८ मिनीटाने बस समृद्धी महामार्गावर आली. १५२ किलोमीटर अंतर कापल्यानंतर बस पहाटे १ वाजून ३२ मिनीटांनी अपघातस्थळी पोहचली.

मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा; 'त्या' बसबाहेर आयुषला जिवंत पाहून मिठीच मारली

सतत बस चालविल्याने चालकाला डुलकी लागली असावी. बस उजव्या भागातील लोखंडी पोलला धडकली. त्याचवेळी चालकाचा बसवरील ताबा सुटला. ८०च्या वेगात असलेली १५ टनची बस दुभाजकला धडकली. बसचा ‘एक्सल’ तुटला. याचवेळी बस डाव्या बाजुला कलंडली. एक्सलच्या मागे असलेल्या डिझेलची टाकी फुटली. बस जवळपास २५ मीटरपर्यंत दुभाजकाला घासत गेली. इंजिन ऑईलची टाकी आणि सिमेंट रस्त्याचे घर्षणाने आग पकडली. याच दरम्यान फुटलेल्या टाकीतील डिझेलनेही पेट घेतला आणि भीषण अपघात घडला.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: Buldana Bus Accident : The bus driver fell asleep and 25 passengers lost their lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.