रानडुकराचा मुलावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:07 AM2021-06-18T04:07:20+5:302021-06-18T04:07:20+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क नांद : वडिलांसाेबत शेतात काम करीत असलेल्या मुलावर रानडुकराने अचानक हल्ला चढवला. यात त्या मुलाला डाेक्यापासून ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
नांद : वडिलांसाेबत शेतात काम करीत असलेल्या मुलावर रानडुकराने अचानक हल्ला चढवला. यात त्या मुलाला डाेक्यापासून तर पायापर्यंत गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना भिवापूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पिरावा परिसरातील वेकाेलिच्या गाेकुल खाणीजवळ बुधवारी (दि. १६) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
पंकज हरिदास शेरकुरे(१६, रा. पिरावा, ता. भिवापूर) असे जखमी मुलाचे नाव आहे. हरिदास शेरकुरे यांची वेकाेलिच्या गाेकुल काेळसा खाणीजवळ शेती आहे. पंकज त्याच्या वडिलांना कपाशीच्या लागवडीत मदत करीत हाेता. दिवसभर पेरणी केल्यानंतर सायंकाळी पेरणी अंतिम टप्प्यात हाेती. त्यातच सायंकाळच्या सुमारास रानडुकराने पंकजवर मागून हल्ला चढवला.
वडिलांनी मदतीसाठी आरडाओरड करीत पंकजला कसेतरी रानडुकराच्या तावडीतून साेडविले. त्यांनी रक्तबंबाळ झालेल्या पंकजला उमरेड येथील खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती केले. त्याला २२ टाके लावण्यात आले असून, प्रकृती स्थिर असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली. दुसरीकडे, हरिदास शेरकुरे यांनी वन अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार नाेंदवित उपचाराचा खर्च देण्याची व रानडुकरांसह इतर वन्य प्राण्यांचा तातडीने बंदाेबस्त करण्याची मागणी केली आहे.
===Photopath===
170621\img-20210617-wa0069.jpg
===Caption===
डूकराचा हल्ला