विजेच्या धक्क्याने बैल ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:08 AM2021-03-21T04:08:59+5:302021-03-21T04:08:59+5:30
कामठी : वादळामुळे तुटलेल्या विजेच्या जिवंत तारांना स्पर्श झाल्याने जाेरात विजेचा धक्का लागला आणि त्यात बैलाचा मृत्यू झाला. ही ...
कामठी : वादळामुळे तुटलेल्या विजेच्या जिवंत तारांना स्पर्श झाल्याने जाेरात विजेचा धक्का लागला आणि त्यात बैलाचा मृत्यू झाला. ही घटना कामठी तालुक्यातील लिहिगाव शिवारात शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी घडली.
प्रभाकर रघुनाथ (३५, रा. लिहिगाव, ता. कामठी) या शेतकऱ्याने त्याची बैलजाेडी शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास पाणी पाजण्यासाठी गावालगतच्या नाल्यावर नेली हाेती. त्याच वेळी या भागात वादळी पावसाला सुरुवात झाली. वादळामुळे विजेच्या खांबावरील तार तुटली आणि ती थेट बैलाच्या अंगावर पडली. त्यामुळे त्या बैलाला जाेरात विजेचा धक्का लागला. हा प्रकार लक्षात येताच शेतकरी व दुसरा बैल बाजूला झाल्याने ते थाेडक्यात बचावले.
यात त्या बैलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती प्रभाकर रघुनाथ यांनी दिली. माहिती मिळताच महावितरणचे कनिष्ठ अभियंता गायधने, तलाठी एस. वकील यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. गाेरले यांनी उत्तरीय तपासणी प्रक्रिया पूर्ण करून अहवाल शासनाकडे सादर केला. या शेतकऱ्याला महावितरण कंपनीने याेग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच गणेश झोड, उपसरपंच सुनीता ठाकरे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.