कावरापेठेत चालला बुलडोझर

By admin | Published: January 13, 2016 03:45 AM2016-01-13T03:45:59+5:302016-01-13T03:45:59+5:30

कावरापेठ येथील रेल्वेमार्गाच्या संरक्षक भिंतीलगत वसलेली झोपडपट्टी नासुप्रच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मंगळवारी हटविली.

Bulldozer running on the edge | कावरापेठेत चालला बुलडोझर

कावरापेठेत चालला बुलडोझर

Next

नासुप्रची कारवाई : ७० झोपड्या हटविल्या
नागपूर : कावरापेठ येथील रेल्वेमार्गाच्या संरक्षक भिंतीलगत वसलेली झोपडपट्टी नासुप्रच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मंगळवारी हटविली.
अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाईला सुरुवात करताच झोपडीतील सामान बाहेर काढण्यासाठी झोपडपट्टीधारकांची एकच तारांबळ उडाली. सुरुवातीला कारवाईल विरोध झाला. परंतु प्रचंड पोलीस बंदोबस्त असल्याने कारवाई सुरळीत पार पडली.
मौजा बिनाकी, बापू अणेनगर येथील खसरा क्रमांक १००/२, आदिवासी को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या खसरा क्रमांक १००/५, ६, ७, ८ व ९ यासह रेल्वे क्रॉसिंगपर्यंतच्या संरक्षक भिंतीलगत ९ मीटर रुंदीचा रस्ता प्रस्तावित आहे. २०११ मध्ये येथे ५८ झोपड्या होत्या. हळूहळू ही संख्या ७० पर्यंत पोहोचली, तसेच रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले होते. नासुप्रने अतिक्रमणधारकांना २०१२ मध्ये नोटिसा बजवल्या होत्या. १२ झोपडपट्टीधारकांना १५ दिवसांपूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीस बजावल्यानंतरही अतिक्रमण न हटविल्याने नासुप्रने ही कारवाई केली.
कारवाईसाठी नासुप्रच्या विभाग ३ चे उपायुक्त यांनी पोलीस बंदोबस्त मागितला होता. पोलीस बंदोबस्त मिळताच ही कारवाई करण्यात आली. प्रथम पथकाने रस्त्यालगत दोन घरमालकांनी केलेले अतिरिक्त बांधकाम हटविण्यात आले. या कारवाईला विरोध झाला. परंतु बंदोबस्तामुळे कारवाई सुरळीत पार पडली. कार्यकारी अभियंता (उत्तर) प्रमोद धनकर, विभागीय अधिकारी अनिल राठोड, सुशील झाडे, अभियंता नेताजी बांबल, वसंत कन्हेरे आदींनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)

Web Title: Bulldozer running on the edge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.