विधीसंघर्षग्रस्त बालकांनीच आकाशवर झाडल्या होत्या गोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 09:23 PM2017-12-19T21:23:29+5:302017-12-19T21:29:58+5:30

आकाश पानपत्ते (२७, रा. खापरखेडा, ता. सावनेर) याच्या खूनप्रकरणात खापरखेडा पोलिसांनी चार विधीसंघर्षग्रस्त बालकांना मंगळवारी (दि. १९) पहाटे खापरखेडा शिवारातील कोलार नदीच्या परिसरातून ताब्यात घेतले.

Bullets were played on the sky only | विधीसंघर्षग्रस्त बालकांनीच आकाशवर झाडल्या होत्या गोळ्या

विधीसंघर्षग्रस्त बालकांनीच आकाशवर झाडल्या होत्या गोळ्या

Next
ठळक मुद्देचौघे ताब्यात : मागून गोळ्या झाडल्याची दिली कबुलीनागपूरनजीकच्या खापरखेडा येथील राजबाबा बियार बारसमोरील हत्याकांड

आॅनलाईन लोकमत
नागपूर : आकाश पानपत्ते (२७, रा. खापरखेडा, ता. सावनेर) याच्या खूनप्रकरणात खापरखेडा पोलिसांनी चार विधीसंघर्षग्रस्त बालकांना मंगळवारी (दि. १९) पहाटे खापरखेडा शिवारातील कोलार नदीच्या परिसरातून ताब्यात घेतले. दुसरीकडे, या चौघांनी सोमवारी मध्यरात्री आत्मसमर्पण केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातील एकाने आकाशवर मागून तीन गोळ्या झाडल्याची कबुली दिली. खुनाची ही घटना शनिवारी (दि. १६) रात्री ८ वाजताच्या सुमारास खापरखेडा येथील राजबाबा बियार बारसमोर घडली होती.
चौघेही शनिवारी रात्री ७ वाजतापासून राजबाबा बियर बारजवळील ठेल्यावर नूडल्स खात बसले होते. आकाश पानपत्ते, रजत गुप्ता, पवन खंगार, नीलेश डेहरिया, लोहित चिकनकर व राकेश तांडेकर हे बारमध्ये दारू पिण्यास गेल्याचे चौघांनी बघितले होते. यातील रजत व नीलेशचा गेम करण्याची या चौघांची योजना होती. ठरल्याप्रमाणे आरोपींपैकी दोघे निळ्या रंगाच्या मोटरसायकलवर (पल्सर) बसून, कोराडी रोडवर उभे होते. तिसरा हातात माऊझर घेऊन खून करण्यासाठी लपून बसला होता तर चौथा या तिघांनाही माहिती देण्याचे काम करीत होता.
रात्री ८ वाजताच्या सुमारास लोहित व पवन भांडत बाहेर आले. पाठोपाठ नीलेश, रजत व राकेश आला आणि तिघेही दोघांची समजूत काढू लागले. त्यात आकाशही बाहेर आला आणि तो त्यांच्या बाजूला असलेल्या दुचाकीवर बसून होता. भांडणामुळे नीलेश व रजतला मारण्याची संधी मिळत नसल्याने माहिती देणारा आरोपी ‘मार मार’ असे बोलत होता. त्यातच अंधारात लपून बसलेल्या तिसऱ्या आरोपीने आकशच्या दिशेने मागून तीन गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या आकाशचे डोके भेदून गेल्या.
त्यानंतर आरोपीने पंचशील सभागृहासमोरून पळत नांदा - कोराडी रोड गाठला. तिथे माऊझर लपवून ठेवले व तो दोघांसोबत मोटरसायकलने खाप्याला गेला. पुढे एक जण खाप्याला थांबला तर दोघे मोटरसायकलने खाप्याहून पारशिवनीला गेले. चौथा आरोपी मात्र खापरखेडा परिसरातच फिरत होता. दरम्यान, चौघेही खापरखेडा नजीकच्या कोलार नदीच्या परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी त्यांना लगेच ताब्यात घेत अटक केली. दुसरीकडे, या चौघांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती काही जाणकार मंडळींनी दिली.

माऊझर जप्त
आकाशवर गोळ्या झाडणाºया आरोपीने त्याच्याकडील माऊझर कोराडी - नांदा रोडच्या कडेला लपून ठेवले होते. चौकशीदरम्यान, त्याने या माऊझरबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्याला घेऊन संबंधित ठिकाण गाठले व माऊझर जप्त केले. आकाश, नीलेश, बादल बोराटे, रजत गुप्ता व वारेगाव येथील राकेश गाडकर यांनी आरोपींपैकी एकाच काही दिवसांपूर्वी बेदम मारहाण केली होती. त्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी त्याने यातील काहींचा गेम करण्याची योजना आखली होती. मारहाणीच्या दिवशीपासून तो या योजनेवर काम करीत होता.

डॉन बनण्याचे इच्छा
या खूनप्रकरणातील चारही आरोपी अल्पवयीन आहेत. यातील एकाची डॉन बनण्याची इच्छा होती. त्यातूनच त्याने विविध गुन्हे करायला सुरुवात केली होती. परंतु, त्याला डॉन बनण्याचे स्वप्न दाखविले कुणी, गुन्हे घडवून आणण्यासाठी त्याला माऊझर उपलब्ध करून दिले कुणी, मारहाणीचा बदला हत्या करून घेण्यास त्याला प्रवृत्त केले कुणी, यासह अन्य महत्त्वाचे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत असून, हे सर्व प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहेत. पोलीस याही दिशेने तपास करीतील काय, असा प्रश्नही काहींनी उपस्थित केला.

Web Title: Bullets were played on the sky only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.