वेकाेलिच्या गाेकुल खाणीत बैलगाडी आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:07 AM2021-06-11T04:07:24+5:302021-06-11T04:07:24+5:30
शेतकरी बचावला तीव्र स्फाेटांमुळे बैल जखमी : हादऱ्यामुळे प्रत्येक घराच्या भिंतीना तडे लाेकमत न्यूज नेटवर्क नांद : वेकाेलिच्या गाेकुल ...
शेतकरी बचावला
तीव्र स्फाेटांमुळे बैल जखमी : हादऱ्यामुळे प्रत्येक घराच्या भिंतीना तडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
नांद : वेकाेलिच्या गाेकुल खाणीतून काेळसा काढण्यासाठी राेज ५० ते १०० टन क्षमतेचे स्फाेट घडवून आणले जातात. अधिक क्षमतेच्या तीव्र स्फाेटामुळे जमिनीला हादरे बसतात. या हादऱ्यामुळे पिरावा (ता. भिवापूर) येथील प्रत्येक घराच्या भिंतींना तडे गेले आहेत. या स्फाेटामुळे उडालेला दगड थेट अंगावर पडल्याने बैल गंभीर जखमी झाला व शेतकरी थाेडक्यात बचावला. ही घटना बुधवारी (दि. ९) सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. याचे पडसाद म्हणून पिरावा येथील शेतकऱ्यांनी गुरुवारी गाेकुल खाण कार्यालयासमाेर बैलगाडी आंदाेलन केले. स्फाेटाची तीव्रता कमी करण्याचे आश्वासन दिल्याने आंदाेलन मागे घेण्यात आले.
या खाणीलगत पिरावा गाव असून, या गावाची लाेकसंख्या १,५०० आहे. अमर नत्थू वैद्य, रा. पिरावा हे बुधवारी सायंकाळी बैलजाेडीला चारा घालत हाेते. त्यातच खाणीतील स्फाेटामुळे उडालेला दगड थेट जाेडीतील एका बैलाच्या अंगावर पडल्याने बैल जखमी झाला. सुदैवाने अमर वैद्य बचावले. त्यांनी या प्रकाराची माहिती लगेच वेकाेलि प्रशासनाला दिली. मात्र, कुणीही वेळीच दखल घेतली नाही. वेकाेलिच्या सुरक्षा अधिकाऱ्याने शेतकऱ्यांची समजूत काढण्याऐवजी त्यांच्याशी उर्मट शब्दात संवाद साधला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असताेष निर्माण झाला.
परिणामी, संतप्त शेतकऱ्यांनी बैलगाडी वेकाेलिच्या प्रवेशद्वाराजवळ आडवी करून आंदाेलनाला सुरुवात केली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत वेकाेलि प्रशासनाने या आंदाेलनाची गांभीर्याने दखल घेतली नव्हती. दुसरीकडे, शेतकरी त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यातच पावसाची रिपरिपही सुरू झाली. मात्र, शेतकऱ्यांनी आंदाेलनस्थळ साेडले नव्हते. त्यातच वेकाेलिने या अधिक क्षमतेच्या स्फाेटावर ताेडगा काढला नाही तर कामबंद आंदाेलन करण्याचा इशाराही ग्रामपंचायत सदस्य कवडू मुळे, स्नेहा वैद्य, कैलास पडोळे, विठ्ठल वरघने, विजय गायकवाड यांच्यासह शेतकऱ्यांनी दिल्याने पेच निर्माण झाला हाेता.
....
स्फाेटाची तीव्रता कमी करू
या खाणीतून पाच वर्षांपासून काेळसा उत्पादन सुरू आहे. या खाणीतून काेळसा काढण्यासाठी अधिक तीव्रतेचे स्फाेट घडवून आणले जातात. या स्फाेटामुळे पिरावा येथील घरे खिळखिळी झाली आहेत. या गावाचे पुनर्वसन करावे, अशी वारंवार मागणी केली जात असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यातच शेतकऱ्यांनी आंदाेलनाला सुरुवात केली. या आंदाेलनाची गुरुवारी (दि. १०) सकाळी दखल घेत वेकाेलिच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना स्फाेटाची तीव्रता कमी करण्याचे आश्वासन दिल्याने आंदाेलन तूर्तास स्थगित करण्यात आले.
............
५० मीटरपर्यंत उडाले दगड
शेतकऱ्यांच्या आंदाेलनामुळे वेकाेलिच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी गावाची पाहणी केली. त्यावेळी त्यांना खाणीतील दगड खाणीपासून ५० मीटर दूरवर पडले असल्याचे आढळून आले. उडणारे दगड नागरिकांसाठी प्राणघातक ठरू शकतात, असेही अधिकाऱ्यांना पटवून देण्यात आले. या खाणीत दिवसभरात पाच ते सहावेळा स्फाेट घडवून आणले जातात. स्फाेटाचा आवाज व जमिनीच्या हादऱ्यामुळे पिरावा येथील महिला व मुलांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या गावाचे पुनर्वसन करणे अत्यावश्यक असतानाही प्रशासन व लाेकप्रतिनिधी केवळ बघ्याची भूमिका घेण्यात धन्यता मानत आहे.
===Photopath===
100621\img_20210610_135705.jpg
===Caption===
बैल बंडी आंदोलन