लोकनाथ यशवंत यांची बैल कविता पुणे विद्यापीठात
By सुमेध वाघमार | Published: March 2, 2024 06:09 PM2024-03-02T18:09:17+5:302024-03-02T18:09:29+5:30
यापूर्वी लोकनाथ यशवंत यांच्या ‘बैल’ या कवितेवर 'बाईस्कोप' हा मराठी चित्रपटही येऊन गेला आहे.
नागपूर : पुणे विद्यापीठाच्या अधिन असलेल्या नौरोजी वाडिया या स्वायत्त्य महाविद्यालय पुणेच्या प्रथम वर्ष बी.ए. ला २०२३ ते २०१७ या वषार्साठी लोकनाथ यशवंत यांची ‘बैल’ ही कविता अभ्यासक्रमासाठी अंर्तभूत करण्यात आली. ही कविता पुन्हा चाल करू या...!' कविता संग्रहातून घेण्यात आली आहे.
यापूर्वी लोकनाथ यशवंत यांच्या ‘बैल’ या कवितेवर 'बाईस्कोप' हा मराठी चित्रपटही येऊन गेला आहे. चार कवितेवर आधारलेला हा एकमेव चित्रपट आहे. या चित्रपटात मिर्झा गालिब यांच्याही कवितेचा समावेश आहे. हात्तावर पोट असलेला अभावग्रस्त शेतमजूर कधिही आत्महत्त्या करित नाही, मात्र सर्व सुख असलेला शेतकरी गळफास घेतो, त्याने असे करू नये आपल्या शोषित बैला कडून जगण्याची प्रेरणा घ्यावी असा 'बैल' कवितेचा आशय आहे.