‘मेट्रो’मुळे कमी व्हावा वाहतुकीचा भार

By admin | Published: November 3, 2015 03:34 AM2015-11-03T03:34:10+5:302015-11-03T03:34:10+5:30

‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीसाठी मेट्रो रेल्वे प्रकल्प एक संजीवनी ठरणार आहे. शहराच्या

The burden of traffic to be reduced due to metro | ‘मेट्रो’मुळे कमी व्हावा वाहतुकीचा भार

‘मेट्रो’मुळे कमी व्हावा वाहतुकीचा भार

Next

नागपूर : ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीसाठी मेट्रो रेल्वे प्रकल्प एक संजीवनी ठरणार आहे. शहराच्या पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण भागात रेल्वे धावणार असल्याने नागपुरातील वाहतुकीचे वाढते संकट दूर होणार आहे. पर्यावरणमुक्त वातावरण आणि रस्त्यावरील वाहतुकीचा भार कमी करणारा तसेच नागपूरला ‘स्मार्ट सिटी’ बनविणारा हा प्रकल्प आहे. सार्वजनिक आणि महत्त्वपूर्ण नागरी वाहतूक प्रकल्प म्हणून घोषित केला आहे.
प्रकल्पात केंद्र सरकारचा २० टक्के, राज्य सरकार २० टक्के, मनपा ५ टक्के आणि नासुप्रचा ५ टक्के वाटा आहे. सध्या कंपनीकडे राज्याचे १९८ कोटी, केंद्राचे १४३ कोटी आणि नासुप्रचे १५० कोटी असे एकूण ४९१ कोटी रुपये आहेत. प्रकल्पासाठी जागेचे अधिग्रहण आणि आर्थिक संकट दूर झाले आहे. जर्मनीच्या केएफडब्ल्यू बँकेने ३७०० कोटी रुपयांचा निधी कर्जस्वरुपात उपलब्ध करून दिला आहे. ३० जानेवारी २०१४ रोजी शासनाने आणि २१ आॅगस्ट २०१४ रोजी केंद्र सरकारने नागपूर रेल्वे प्रकल्पास मंजुरी प्रदान केली आहे. मेट्रो रेल्वे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी ८६८० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा प्रकल्प २०१८ पर्यंत कार्यान्वित होणार आहे. (प्रतिनिधी)
निधीचा प्रश्न सुटला
मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या उभारणीसाठी निधीचा प्रश्न सुटला आहे. कंपनीला ४५०० कोटी कर्जस्वरुपात उभे करायचे आहे. त्यात जर्मनी येथील केएफडब्ल्यू बँकेने ३७०० कोटी रुपये कर्जस्वरुपात २० वर्षांच्या मुदतीवर देण्यास मंजुरी दिली आहे. प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाल्यानंतर ही रक्कम टप्प्याटप्प्याने कंपनीला केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून मिळणार आहे. तर उर्वरित रक्कम फ्रान्सची कंपनी देणार आहे.
लहान-मोठ्या ७८ जागांचे अधिग्रहण
प्रकल्पासाठी जागेच्या अधिग्रहणाची समस्या आता संपली आहे. मनपा, नासुप्र, मिहानची जागा कंपनीच्या ताब्यात असून एसआरपीएफ फायरिंंग रेंजच्या जागेवर शिक्कामोर्तब झाले आहे. उत्तर-दक्षिण मार्ग १९.६५८ कि़मी. आणि पूर्व पश्चिम मार्ग १८.५५७ कि़मी. अर्थात दोन्ही मार्ग एकूण ३८.२१५ कि़मी.चे राहणार आहे. प्रकल्पाला लागणाऱ्या बहुतांश जागा शासनाच्या ताब्यात आहेत, पण लहानमोठ्या ७८ जागांचे अर्थात ३.५० हेक्टर जागेचे अधिग्रहण करावे लागेल. चर्चेद्वारे आणि शासनाच्या योजनेंतर्गत जागेचा मोबदला देण्यात येणार आहे.
रेल्वे सौर ऊर्जेवर धावणार
नागपूर हे सर्वाधिक उष्ण शहर म्हणून ओळखले जाते. उन्हाळ्यात तापमान ४८ डिग्रीवर पोहोचते. हे तापमान या प्रकल्पासाठी वरदान ठरणार आहे. प्रकल्पाला इको फें्रडली बनविण्यासाठी रेल्वे सौर ऊर्जेवर धावणार आहे. अधिकाधिक उष्णता शोषून वीज तयार होऊ शकेल, अशा मेट्रोच्या इमारती आणि छताचे डिझाईन तयार करण्यात येत आहे. यासाठी जर्मन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत असून त्याद्वारे ४० मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीची अपेक्षा आहे.
इको फ्रेंडली मेट्रो रेल्वे
हा प्रकल्प इको फ्रेंडली राहणार आहे. प्रारंभीपासूनच मेट्रोतून ३.५० लाख प्रवासी दररोज प्रवास करतील, अशी अपेक्षा आहे. मुंजे चौकात २५ मीटर उंच अद्ययावत व देखणे टॉवर बनणार असून त्यावर रेल्वे धावणार आहे. याशिवाय अंबाझरी तलावावर एक हॅँगिंग स्टेशन राहील. यावरून प्रवाशांना तलावाचे सौंदर्य निरखून पाहता येईल. ‘माझी रेल्वे’ अशी भावना नागपूरकरांमध्ये निर्माण व्हावी, असा कंपनीचा प्रयत्न आहे.
छोटे-छोटे स्टेशन राहणार
अन्य मेट्रोच्या तुलनेत (सहा ते दहा मिनिटे) नागपूर मेट्रो रेल्वे प्रत्येक दीड मिनिटात धावेल, अशी संवादावर आधारित सर्वोत्तम वाहतूक नियंत्रण (सीबीटीसी) यंत्रणा बसविण्यात येणार आहे. या यंत्रणेमुळे मेट्रो स्टेशन मोठे बनविण्याची गरज भासणार नाही.
मिहान येथून
कामाचा प्रारंभ
मिहान (खापरी) येथील ३८ हेक्टर जागा कंपनीच्या ताब्यात असल्यामुळे प्रारंभी या ठिकाणावरून मेट्रो रेल्वेच्या बांधकामाचा प्रारंभ करण्यात आला. मेट्रो रेल्वे भूमिगत धावणार नाही. पण मिहान (खापरी) येथील कॉरिडोअर आणि तेथून पुढे ४.६ कि़मी.चा टप्पा जमिनीवर राहणार आहे.
मेट्रोच्या आॅफिसला कॉर्पोरेट लूक
मेट्रो रेल्वेच्या कार्यालयीन इमारतीचे बांधकाम नासुप्रच्या रामदासपेठ, सेंट्रल बाजार रोड, लेन्ड्रा येथील ६३५९.८४ चौरस मीटर जागेवर वेगात सुरू असून वर्षभरात पूर्ण होणार आहे. २३ कोटींचा अपेक्षित खर्च आहे. इमारत सात मजली (तळमजला व सहा मजले) असून चारही बाजूला लॅण्ड स्केपिंग, हिरवळ आणि वृक्ष लावण्यात येणार आहे. या कार्यालयातून मेट्रो रेल्वेच्या सर्व कामांवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
भारतीय बनावटीची उपकरणे
प्रकल्पाला लागणारी उपकरणे भारतीय बनावटीची राहतील. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथील कारखान्यातील कोच आणि वाहतुकीसाठी फ्रान्स किंवा जर्मनी देशातील सीबीटीसी यंत्रणा राहणार आहे. त्यामुळे जास्त गाड्या चालविता येतील. बांधकाम दिवसरात्र सुरू राहणार आहे. यासाठी ओव्हरहेड क्रेन राहणार आहे.
प्रशासकीय इमारतीची रचना
४भूखंडाचे क्षेत्रफळ ६३५९.८४ चौरस मीटर
४४०५५.४४ चौरस मीटर तळघर व तळमजल्यावर ११२ कार, २३४ स्कूटर व २२४ सायकलसाठी पार्किंग.
४पहिला ते पाचव्या मजल्यावर प्रत्येकी ९१२ चौरस मीटर क्षेत्रात कार्यालय.
४सहा मजल्यावर कॉन्फरन्स हॉल व १५० चौरस मीटर क्षमतेचे आॅडिटोरियम असे एकूण २०१३ चौरस मीटर.
वेबसाईटवर कामाची माहिती
मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि विकास कामांची माहिती देण्यासाठी कंपनीने वेबसाईट तयार केली आहे. या वेबसाईटवर टप्प्याटप्प्याने होणाऱ्या विकास कामांची माहिती अपडेट करण्यात येत आहे.

प्रवाशांची अंदाजे संख्या (लाखांत)
वर्षअंदाजे प्रवासी
२०२१३.८४
२०२६४.१९
२०३१४.५९
२०३६५.०८
२०४१५.६४
मेट्रो मार्गाची लांबी (कि़मी.)
कॅरिडोअर स्टेशनएकूण लांबी
आॅटोमोटिव्ह चौक१७१९.६५८
ते मिहान (खापरी)
प्रजापतिनगर ते १९१८.५५७
लोकमान्यनगर
एकूण ३६३८.२१५

मेट्रो रेल्वेची वेबसाईट
६६६.ेी३१ङ्म१ं्र’ल्लँस्र४१.ूङ्मे

मेट्रोमुळे लोकांचे जीवनमान उंचावणार
जलद परिवहनासाठी नागपुरात मेट्रो रेल्वेचे बांधकाम ‘पीपल फ्रेंडली’ राहील. हा प्रकल्प कुणालाही त्रास न होता २०१८ च्या अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. मेट्रो माझ्यासाठी आहे, असे लोकांना वाटले पाहिजे. गाड्या पार्किंगमध्ये ठेवून मेट्रोने प्रवास करावा, असे उद्दिष्ट आहे. रस्त्यावरील अपघात कमी व्हावेत, पर्यावरणमुक्त वातावरण आणि रस्त्यावरील वाहतुकीचा भार कमी करणारा हा प्रकल्प आहे. लोकांचे जीवनमान उंचावण्याचा मेट्रोचा उद्देश आहे. कालबद्ध कार्यक्रमानुसार प्रकल्पाचे काम सुरू असून त्यात लोकांचा सहभाग आवश्यक आहे. ‘स्मार्ट सिटी’च्या विकासात भर टाकणारा हा प्रकल्प आहे.
बृजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक,
नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड.

Web Title: The burden of traffic to be reduced due to metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.