नागपुरात कोरोनाबाधिताच्या घरी घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 08:07 PM2020-07-27T20:07:43+5:302020-07-27T20:09:09+5:30
कोरोनाबाधिताच्या घरी शिरून चोरट्यांनी रोख सोन्याचे दागिने आणि टीव्हीसह सव्वालाखाचा मुद्देमाल लंपास केला. रविवारी याप्रकरणी कळमना ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधिताच्या घरी शिरून चोरट्यांनी रोख सोन्याचे दागिने आणि टीव्हीसह सव्वालाखाचा मुद्देमाल लंपास केला. रविवारी याप्रकरणी कळमना ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. शुभम खुशाल शेंद्रे (वय २४) असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. ते कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलशननगरात राममंदिरजवळ राहतात. कोरोनाची लक्षणे दिसल्यामुळे त्यांना आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना वनामती येथे १३ जुलैला क्वारंटाईन करण्यात आले होते. १३ ते २१ जुलैदरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला आणि घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने तसेच एलईडी टीव्ही असा एकूण एक लाख १५ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. रविवारी ही घटना उघडकीस आली. शेंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.