म्हाडाच्या शील कंपनीच्या आगीत जळलेल्या फाइल चार महिन्यात उपलब्ध होणार - प्रकाश महेता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 07:42 PM2018-07-10T19:42:14+5:302018-07-10T19:42:45+5:30
म्हाडाच्या फाईल संरक्षणार्थ दिलेल्या शील कंपनीच्या इमारतील लागलेल्या आगीत १७ हजार ९९० जाळल्या असून ४ हजार ७४९ फाईल पाण्याने भिजल्या आहेत. या सर्व फाइलच्या प्रती येत्या ४ महिन्यात ही कंपनी उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली.
नागपूर : म्हाडाच्या फाईल संरक्षणार्थ दिलेल्या शील कंपनीच्या इमारतील लागलेल्या आगीत १७ हजार ९९० जाळल्या असून ४ हजार ७४९ फाईल पाण्याने भिजल्या आहेत. या सर्व फाइलच्या प्रती येत्या ४ महिन्यात ही कंपनी उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली.
नवी मुंबईतील महापे या ठिकाणी असलेल्या शील कंपनीच्या इमारतीला लागलेल्या आगीत भस्मसात झालेल्या म्हाडाच्या फाइल बाबत तारांकित प्रश्न मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी विचारला होता. त्याला उत्तर देताना गृहनिर्माण मंत्री यांनी सांगितले की, म्हाडा व शील प्रोजेक्ट लिमिटेड यांच्याशी १२/१०/२०१२ रोजी झालेल्या करारानुसार म्हाडाच्या ५ लाख ३४ हजार ४७६ फाईल जनत करण्यासाठी देण्यात आल्या होत्या त्या पैकी एकूण १७ हजार ९९० जाळल्या असून ४ हजार ७४९ फाइल पाण्याने भिजल्या आहेत.
या सर्व फाइलच्या प्रती येत्या ४ महिन्यात ही कंपनी उपलब्ध करून देणार आहे, याचा खर्च सदर कंपनी करणार असून, या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत असेही, मंत्र्यांनी स्पष्ट केले.