बसस्थानकातील विक्रेत्यांच्या संसाराची गाडी पुन्हा रुळावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:11 AM2021-08-24T04:11:31+5:302021-08-24T04:11:31+5:30
दररोज धावतात एक हजार बसेस अनलॉकनंतर सध्या नागपुरातील गणेशपेठ बसस्थानकावरून तब्बल एक हजार बसेस धावत आहेत. यात प्रवाशांची संख्याही ...
दररोज धावतात एक हजार बसेस
अनलॉकनंतर सध्या नागपुरातील गणेशपेठ बसस्थानकावरून तब्बल एक हजार बसेस धावत आहेत. यात प्रवाशांची संख्याही ३० हजारावर गेली आहे. त्यामुळे बसस्थानकावरील खाद्यपदार्थ तसेच इतर वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांची चांगली कमाई होत असल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
गावाकडे जाऊन मजुरी केली ()
-कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर व्यवसाय बंद झाला. कुटुंबाची उपजीविका भागविण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात गेलो. तेथे शेतात मजुरी करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागविली.
-आतिष साबळे
मिळेल ते काम केले ()
-लॉकडाऊनमुळे काम बंद झाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. परंतु हिंमत न हारता मिळेल ते काम करून कुटुंबाचे पालनपोषण केले. आता पुन्हा व्यवसाय सुरु झाल्यामुळे उत्पन्नाचा प्रश्न मिटला आहे.
-चंद्रकांत कोकाटे
बांधकाम मजूर म्हणून काम केले ()
-कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यामुळे काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु शहरातील काही भागात सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी जाऊन तेथे मजुरी केली आणि त्यातून मिळालेल्या पैशातून कुटुंबाची उपजीविका भागविली.
-शेख अनवर शेख प्यारे
एसटीला द्यावे लागतात पैसे
-बसस्थानकावर वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांना एसटी महामंडळाला शुल्क द्यावे लागते. संबंधित विक्रेता कोणती वस्तू विकतो यावरून त्याला किती पैसे द्यायचे, याचा भाव ठरतो. ५०० ते १३०० रुपये महिन्याकाठी या विक्रेत्यांकडून आकारण्यात येत असल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
..............