नागपूरच्या महालक्ष्मी कोराडी मंदिर परिसरात बसडेपो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 11:45 PM2019-01-21T23:45:07+5:302019-01-21T23:45:32+5:30
कोराडी येथे श्री महालक्ष्मी जगदंबा मातेच्या मंदिर परिसराचा विकास आराखड्यानुसार भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. भाविकांसाठी सुमारे नऊ कोटी रुपये खर्च करुन बसडेपोची उभारणी करण्यात आली आहे. या परिसरातील विविध भागात भाविकांना जाणे सुलभ व्हावे, यादृष्टीने बसडेपोचा विकास करण्यात आला आहे. ही जागा महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिल्यात.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोराडी येथे श्री महालक्ष्मी जगदंबा मातेच्या मंदिर परिसराचा विकास आराखड्यानुसार भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. भाविकांसाठी सुमारे नऊ कोटी रुपये खर्च करुन बसडेपोची उभारणी करण्यात आली आहे. या परिसरातील विविध भागात भाविकांना जाणे सुलभ व्हावे, यादृष्टीने बसडेपोचा विकास करण्यात आला आहे. ही जागा महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिल्यात.
बसडेपोच्या देखभाल व दुरुस्तीसोबतच स्वच्छतेसंदर्भातील करार एनएमआरडी व महानगरपालिकेने केल्यानंतर ही जागा हस्तांतरित करावी, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
ताजबाग विकास आराखड्याला गती
ताजबाग येथे मध्य भारतातून मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहत असल्यामुळे या संपूर्ण परिसराच्या विकासासाठी १३२ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून विकास आराखड्यानुसार बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत. या कामांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी तसेच परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ताजबाग ट्रस्टने पुढाकार घ्यावा, अशा सूचना पालकमंत्री यांनी दिल्यात. ताजबाग परिसरातील विविध विकास कामांचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. यामध्ये सरायचे नूतनीकरण, पिण्याच्या पाण्यासाठी साडेसात लाख लिटर टाकीचे बांधकाम आदी कामांचा समावेश आहे. या परिसरात ६० कोटींचे काम पूर्ण झाले असून ४२ कोटी रुपयांच्या निविदानुसार कामांना सुरुवात झाली आहे. पूर्ण झालेले काम हस्तांतरित करण्यात आले असल्याचे पालमंत्र्यांनी सांगितले.