इथेनॉलवरील बस वाडी नाक्यावर पोहचली

By Admin | Published: July 31, 2014 01:10 AM2014-07-31T01:10:16+5:302014-07-31T01:10:16+5:30

स्वीडनची स्कॅनिया कंपनी महापालिकेला प्रायोगिक तत्त्वावर इथेनॉलवर चालणाऱ्या पाच बसेस उपलब्ध करणार आहे. मनपाच्या परिवहन विभागामार्फत या बसेस चालविल्या जाणार आहे. १६ आॅगस्टला बसचे

Bus on ethanol reached the wadi nose | इथेनॉलवरील बस वाडी नाक्यावर पोहचली

इथेनॉलवरील बस वाडी नाक्यावर पोहचली

googlenewsNext

महापालिका : १६ आॅगस्टला लोकार्पण
नागपूर : स्वीडनची स्कॅनिया कंपनी महापालिकेला प्रायोगिक तत्त्वावर इथेनॉलवर चालणाऱ्या पाच बसेस उपलब्ध करणार आहे. मनपाच्या परिवहन विभागामार्फत या बसेस चालविल्या जाणार आहे. १६ आॅगस्टला बसचे लोकार्पण होणार आहे. ही बस बुधवारी वाडी नाक्यावर पोहचली आहे.
महापौर अनिल सोले यांनी या बसचे अवलोकन केले. मनपातील सत्तापक्षनेते प्रवीण दटके, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, परिवहन समितीचे सभापती बंडू राऊ त, प्रकाश तोतवाणी आदी यावेळी उपस्थित होते. इथेनॉलवर चालणारी ही देशातील पहिलीच बस आहे. पहिल्या टप्प्यात तीन महिने ही बस चालविली जाईल. त्यानंतर पुन्हा चार बसेस मिळतील. या बसेस मोफत मिळणार असल्याने मनपावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही. या बसमुळे प्रदूषणाला आळा बसण्याला मदत होईल. पहिल्या टप्प्यात ही बस विमानतळ ते सीताबर्डी दरम्यान चालविण्याचा विचार आहे. सोबतच अन्य मार्गावर चालविण्याचा विचार केला जात असल्याचे सोले यांनी सांगितले. या बसेस चालविण्यासाठी चालकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. ही बस वातानुकूलित असून ३७ आसनी आहे. तसेच १२ प्रवासी उभे राहू शकतील. बसमध्ये हायड्रोलिक यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे. सुविधा म्हणून बसची चाके खाली-वर करता येतात. वृद्धांना बसमधून उतरण्यासाठी जमिनीपर्यत शिडीची व्यवस्था आहे. बसच्या मागेपुढे कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. या बसचे भाडे राज्य परिवहन महामंडळामार्फत ठरविले जाणार आहे. लोकार्पण समारंभाला केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान व केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर आदी उपस्थित राहतील.(प्रतिनिधी)

Web Title: Bus on ethanol reached the wadi nose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.