व्यापाºयांचा बँकेवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 01:37 AM2017-10-23T01:37:36+5:302017-10-23T01:37:48+5:30

 Business aggression attack on bank | व्यापाºयांचा बँकेवर हल्लाबोल

व्यापाºयांचा बँकेवर हल्लाबोल

Next
ठळक मुद्देदैनिक ठेव परत करण्याची मागणी : खातेदारांचे जवळपास ३० लाख रुपये अडकले

लोकमत न्यूज नेटवर्क
मनसर : दैनिक ठेव अभिकर्त्या(पिग्मी एजन्ट)ने आत्महत्या केल्याने मनसर येथील व्यापाºयांच्या दैनिक ठेव रकमेची नवी समस्या निर्माण झाली आहे. त्या अभिकर्त्याने व्यापाºयांकडून रोज ठेवीच्या रूपात रक्कम गोळा केली. परंतु ती रक्कम बँकेत संबंधितांच्या खात्यात जमा केली नाही. हा प्रकार जेव्हा व्यापाºयांच्या निदर्शनास आला, तेव्हा व्यापाºयांनी शनिवारी बँकेत जाऊन शाखा व्यवस्थापकांशी चर्चा केली. ही रक्कम ३० लाख रुपयांच्या आसपास असून, व्यापाºयांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दुसरीकडे, ही रक्कम नेमकी कुणाकडून व कशी वसूल करायची, असा पेच बँक व्यवस्थापनासमोर निर्माण झाला आहे.

दिलीपसिंह चव्हाण, रा. मनसर, ता. रामटेक असे मृत दैनिक ठेव अभिकर्त्याचे नाव आहे. ते गेल्या २५ वर्षांपासून सिंडिकेट बँकेच्या मनसर शाखेत दैनिक ठेव अभिकर्ता म्हणून काम करायचे. त्यांचे मनसर येथील व्यापाºयांपासून तर सामान्य व्यक्तीपर्यंत सलोख्याचे संबंध होते. त्यामुळे बहुतांश नागरिक त्यांच्यावर विश्वास ठेवायचे. त्यांच्या याच संबंधांमुळे मनसर येथील बहुतांश सर्वच व्यापाºयांनी तसेच काही नागरिकांनी त्यांच्याकडे अर्थात सिंडिकेत बँकेच्या मनसर शाखेत दैनिक बचत खाते उघडले होते. सुरुवातीची काही वर्षे ते प्रत्येकालाच नित्यनेमाने पैसे मिळाल्याची बँकेची रीतसर पावती द्यायचे.
त्यांनी अनेकांना दैनिक बचत ठेवीचा कालावधी संपताच खात्यातील संपूर्ण रक्कम न मागता परत केली. परिणामी, व्यापाºयांसह नागरिकांचा त्यांच्यावरील विश्वास द्विगुणित झाला. याच विश्वासापोटी व्यापारी व नागरिकांनी त्यांना पैसे भरल्याची पावती मागणे बंद
केले; मात्र ते संबंधितांना रक्कम भरल्याची पावती द्यायचे, सोबतच पुस्तिकेमध्ये रक्कम मिळाल्याची नोंदही करायचे.
याबाबत व्यापाºयांनी माहिती गोळा करायला सुरुवात केली. त्यातच प्रत्येकाने त्यांची रक्कम परत मिळविण्यासाठी धडपडही सुरू केली. दरम्यान, शनिवारी दुपारी मनसर व्यापारी संघ व नागरिकांनी पंचायत समितीचे माजी उपसभापती उदयसिंग यादव यांच्या नेतृत्वात सिंडिकेट बँकेच्या मनसर शाखेवर मोर्चा नेला. त्यावेळी व्यापारी व नागरिकांनी बँक व्यवस्थापक कडबे यांच्याकडे आपली रक्कम परत देण्याची मागणी रेटून धरली. त्यावर व्यवस्थापक कडबे यांनी खातेदारांच्या रीतसर नोंदीनुसार जेवढी रक्कम खात्यात जमा असेल, तेवढीच रक्कम मिळणार असल्याचे सांगितले. त्यामुळे उदयसिंग यादव यांनी लगेच बँकेचे झोनल मॅनेजर वाघले यांच्याशी संपर्क साधला.
परंतु, त्यांच्याकडूनही समाधानकारक उत्तर मिळाले नाही, असे यादव यांनी सांगितले. त्यामुळे व्यापारी संघाने याबाबत पोलिसांत तक्रार नोंदवून ग्राहक तक्रार निवारण केंद्रात दाद मागण्याचा निर्णय घेतला.

दैनिक अभिकर्त्याची आत्महत्या
दीड महिन्यापूर्वी दिलीपसिंह चव्हाण यांनी रामटेक परिसरातील खिंडसी जलाशयात उडी मारून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमुळे स्थानिक व्यापारी वर्गात उलटसुलट चर्चेला उधाण आले. त्यानी आत्महत्या का केली असावी, आता आपल्या पैशांचे काय होणार, रक्कम परत मिळणार की नाही, असे विविध प्रश्न व्यापाºयांना सतावत होते. सोबतच व्यापारी व नागरिक त्यांची रक्कम परत मिळविण्यासाठी अधूनमधून बँकेच्या चकरा मारायला लागले. त्यातच बँकेत कित्येक खातेदारांच्या नावाची नोंद नसणे, अनेकांची रक्कम अर्धवट भरणे या बाबी समोर आल्या. त्यांनी कुणाचीच दैनिक बचत खात्यातील रक्कम पूर्ण भरलेली नाही, असेही बँकेतील दस्तऐवजावरून उघड झाले.

बँक व्यवस्थापनाचे दुर्लक्ष
आपला पिग्मी एजंट रोज बँकेत त्याने व्यापाºयांकडून किंवा नागरिकांकडून गोळा केलेली रक्कम भरतो की नाही, याची खात्री करून घेण्याची जबाबदारी ही संबंधित बँक व्यवस्थापनाची किंवा अधिकाºयांची असते. मात्र, सिंडिकेट बँकेतील अधिकारी किंवा कर्मचाºयांनी दैनिक अभिकर्ता दिलीपसिंह चव्हाण यांना त्यांनी गोळा केलेल्या व बँकेत भरलेल्या रकमेबाबत कधीही विचारपूस केली नाही. विशेष म्हणजे, त्यांना दैनिक वसुलीची मशीनसुद्धा बँकेने दिली नाही. त्यांच्याकडे जवळपास २०० व्यापारी व नागरिकांचे दैनिक ठेव खाते होते. या खात्यातील एकूण रकमेचा आकडा हा ३० लाखांच्या आसपास असून, एवढ्या रकमेचा घोळ असल्याचे नागरिक सांगतात.

Web Title:  Business aggression attack on bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.