पंजाबमधील उद्योगधंदे चौपट, प्रतिमाही होत आहे मलिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:05 AM2020-12-28T04:05:12+5:302020-12-28T04:05:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर अडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाने पंजाबला जे वळण दिले ...

Businesses in Punjab are quadrupling, the image is getting dirty | पंजाबमधील उद्योगधंदे चौपट, प्रतिमाही होत आहे मलिन

पंजाबमधील उद्योगधंदे चौपट, प्रतिमाही होत आहे मलिन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर अडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाने पंजाबला जे वळण दिले आहे, त्यामुळे पंजाबची प्रतिमा मलिन होत आहे. पंजाब आणि नजीकच्या सीमावर्ती हरियाणाच्या काही जिल्ह्यांमध्ये तथाकथित शेतकरी मोबाईल टॉवर्स बंद करण्यात मश्गूल आहेत. पेट्रोल पंप आणि स्टोर्स उघडू दिले जात नाहीत. जाणकारांच्या मते, उद्योग विरोधी पोस्टर्सचा धुमाकूळ असलेल्या या आंदोलनाचा फटका केवळ मोबाईल कंपन्यांनाच बसत आहे असे नाही तर यामुळे उद्योगधंदेही डबघाईला आले आहेत. एसोचैमच्या आकलनानुसार शेतकरी आंदोलनाने उद्योगधंद्यांना दररोज ३५०० कोटी रुपयांचा फटका बसत आहे.

मोबाईल टॉवर बंद केल्याने ऑनलाईन व्यवसायाशी निगडित नागरिकांचे भविष्य अंधकारात गेले आहे. सोबतच विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लासेसही बंद पडले आहेत. कोरोना महामारीच्या काळात वर्क फ्रॉम होमचा विचारही डब्बाबंद पडला आहे. विशेषज्ञांच्या मतानुसार, आंदोलनाची आग आता पंजाबच्या अंतर्गत भागातही पोहोचलेली आहे. लहान-मोठे व्यवसाय करणाऱ्या नागरिकांसोबतच पंजाबचा प्रसिद्ध होजियरी उद्योगही आंदोलनामुळे डबघाईला आला आहे. एवढेच नव्हे तर स्वत: शेतकऱ्यांनाही येणाऱ्या काही दिवसांत विद्युत संकटाचा सामना करावा लागणार आहे. मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचा का असेना, त्यांचे प्रयत्न पंजाबमध्ये गुंतवणूक आणण्याचे असतात. परंतु, दुर्दैवाने आंदोलनाच्या काळात सर्वच पक्षांचे नेते गप्प बसले आहेत. व्होट बँकेसाठी पंजाबमध्ये उद्योगधंदे आणि शेतकऱ्यांना एकमेकांच्या विरोधात उभे करणारे पंजाबचे नुकसान करणार असल्याचे मत पंजाबचे हितचिंतक व्यक्त करत आहेत. पंजाबमधील औद्योगिकीकरण नष्ट करून ते पंजाबसोबतच शेतकऱ्यांचेही नुकसानच करणार आहेत. बंगालमध्येही उद्योगधंद्यांना अशाच तऱ्हेने विरोध केला गेला आणि आज ते राज्य आर्थिक विवंचनेत राहिले आहे. ही बाब शेतकऱ्यांनी समजून घेणे गरजेचे आहे. त्यांचा उपयोग केवळ राजकीय शस्त्र म्हणून केला जात असल्याची भावनाही व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांचे सुरू असलेले हे आंदोलन पं. बंगालमधील सिंगुर जमीन विवादाचे स्मरण करून देत आहे. त्या आंदोलनाचे भोग संपूर्ण बंगालला भोगावे लागले होते आणि टाटाचा नॅनो प्लांट गुजरातमध्ये शिफ्ट करण्यात आला होता. त्याचा फटका सिंगुलमधील शेतकऱ्यांना बसला आणि आज ते अत्यंत बिकट परिस्थितीत जगत आहेत. विशेष म्हणजे, ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री पदावर येताच टाटा कंपनीला बंगालमध्ये मोठे उद्योग आणण्यासाठी आमंत्रित केले होते. पंजाबने प. बंगालकडून शिकवण घेणे गरजेचे आहे.

.........

Web Title: Businesses in Punjab are quadrupling, the image is getting dirty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.