बसपातही गोंधळ
By admin | Published: January 29, 2017 01:48 AM2017-01-29T01:48:39+5:302017-01-29T01:48:39+5:30
नागपूर महानगरपालिकेच्या विशेषत: उत्तर नागपुरातील जागा वाटपावरून बसपात गोंधळ उडला आहे. वरिष्ठ
जागा वाटपावरून कार्यकर्त्यांचा संताप : गरुड-उपासक यांच्याविरुद्ध रोष
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या विशेषत: उत्तर नागपुरातील जागा वाटपावरून बसपात गोंधळ उडला आहे. वरिष्ठ नेतृत्वाने ज्या उमेदवारांना तिकिटा मंजूर केल्या आहेत त्यातील काही नावांवरून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप आहे. शनिवारी या कार्यकर्त्यांनी खुद्द प्रदेशाध्यक्ष विलास गरुड आणि प्रभारी उपासक यांच्यासमोरच आपली नाराजी व्यक्त केली व विरोध दर्शविला.
कार्यकर्त्यांचा हा संताप इतका तीव्र होता की प्रदेशाध्यक्ष बैठकीतून निघून गेले. कार्यकर्ते सायंकाळपर्यंत त्यांची वाट पाहत राहिले.नागपुरातील महापालिका निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांची यादी पक्की करण्यासाठी बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड हे दोन दिवसांपासून कॉटन मार्केटस्थित हॉटेल गुजरात येथे थांबले होते. प्रदेश प्रभारी उपासकही आले.
या दोघांच्या उपस्थितीत हॉटेल गुजरात येथे शहरातील काही जागा निश्चित करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
२०१२ ची पुनरावृत्ती होण्याची भीती
२०१२ च्या निवडणुकीमध्ये सुद्धा राज्याच्या वरिष्ठ नेतृत्वाने उमेदवारी लादल्याने कार्यकर्त्यांची भांडणे झाली होती. इतकेच नव्हे तर काही ज्येष्ठ नेत्यांच्या घरावरही कार्यकर्त्यांनी हल्ले केले होते. तीच पुनरावृत्ती पुन्हा होण्याती भीती बसपाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
बसपाची शनिवारी कुठलीही बैठक झालेली नाही. काल बैठक झाली. त्यामुळे गोंधळ होण्याचा प्रश्नच येत नाही. सध्या प्रदेशाध्यक्षांसह आम्ही विविध जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहोत. तसेच निवडणुकीची ही वेळ आहे. काही कार्यकर्त्यांना काही मिळाले नाही, तर नाराजी येत असते. बसपा सध्या वाढत आहे. त्यामुळे विरोधी पक्षानेच पसरवलेले हे वृत्त असावे.
- जितेंद्र म्हैसकर , प्रदेश महासचिव, बसपा