बुटीबोरीत महाआरोग्य तपासणी शिबिर आज : ज्योत्स्ना दर्डा स्मृतिप्रीत्यर्थ आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 12:21 AM2019-03-26T00:21:22+5:302019-03-26T00:30:19+5:30

समाजातील गरीब, वंचित घटकांच्या कल्याणाची बांधिलकी जोपासण्याचा एक भाग म्हणून जैन सहेली मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंगळवार २६ मार्च रोजी नि:शुल्क महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमती ज्योत्स्ना दर्डा मेमोरियल वूमन डेव्हलपमेंट अ‍ॅन्ड वेल्फेअर सेंटर ६, जैन सहेली मंडळ, पी-६०, आर अ‍ॅन्ड सी झोन, इरा इंटरनॅशनल शाळेजवळ, एमआयडीसी इंडस्ट्रीयल परिसर, बुटीबोरी येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत हे शिबिर सर्वांसाठी खुले असणार आहे. या शिबिराचा लाभ महिला, पुरुष व बालकांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

At Butibori Mega Health Checkup Camp today: Organised in Jyotsna Darda Memory | बुटीबोरीत महाआरोग्य तपासणी शिबिर आज : ज्योत्स्ना दर्डा स्मृतिप्रीत्यर्थ आयोजन

बुटीबोरीत महाआरोग्य तपासणी शिबिर आज : ज्योत्स्ना दर्डा स्मृतिप्रीत्यर्थ आयोजन

Next
ठळक मुद्देलोकमत व जैन सहेली मंडळाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समाजातील गरीब, वंचित घटकांच्या कल्याणाची बांधिलकी जोपासण्याचा एक भाग म्हणून जैन सहेली मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंगळवार २६ मार्च रोजी नि:शुल्क महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमती ज्योत्स्ना दर्डा मेमोरियल वूमन डेव्हलपमेंट अ‍ॅन्ड वेल्फेअर सेंटर ६, जैन सहेली मंडळ, पी-६०, आर अ‍ॅन्ड सी झोन, इरा इंटरनॅशनल शाळेजवळ, एमआयडीसी इंडस्ट्रीयल परिसर, बुटीबोरी येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत हे शिबिर सर्वांसाठी खुले असणार आहे. या शिबिराचा लाभ महिला, पुरुष व बालकांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लोकमत व जैन सहेली मंडळ, नागपूरद्वारा आयोजित या शिबिराला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, बुटीबोरी यांचे सहकार्य मिळाले आहे. शिबिराचे उद्घाटन नागपूर आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, शासकीय दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर व लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांच्या उपस्थितीत होईल.
महिला व बालकांच्या सक्षमीकरणाचाच एक भाग म्हणून या भव्य नि:शुल्क महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिरात शासकीय दंत रुग्णालयाची चमू दंत विकारासोबत मुख कर्करोगाचीही तपासणी करील. यासाठी विशेष ‘डेंटल व्हॅन’ उपलब्ध असणार आहे. मेडिकल रुग्णालयाकडून नेत्र तपासणी, चष्म्याचे नंबर काढण्यापासून ते डोळ्यांचे आजार, हाडांचे आजार, बालकांचे आजार, कान-नाक-घशाचे आजार, महिलांचे आजार, त्वचेचे आजार, श्वसन व दम्याचे आजार, सामान्य आजार आदी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासले जातील. शिबिरात विविध कर्करोग, सामान्य शस्त्रक्रिया तज्ज्ञ सहभागी होणार असल्याने या आजाराशी संबंधित रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन केले जाईल.
हे शिबिर सर्वांसाठी असून रुग्णांची नोंदणी शिबिराच्या ठिकाणीच दुपारी १ वाजेपर्यंत होईल. बुटीबोरी व आजूबाजूच्या गावातील महिला, पुरुष यांनी या सुवर्णसंधीचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा, असे आवाहन लोकमत व जैन सहेली मंडळातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९९२२९१५०३५, ९८८१७४९३९०, ९८२२४०६५६२ यावर संपर्क साधावा.
शिबिरात या तज्ज्ञांचा असणार सहभाग
या शिबिरात महिला, पुरुष व बालकांसाठी वैद्यकीय तज्ज्ञ, अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, कर्करोग तज्ज्ञ , नेत्ररोग तज्ज्ञ, नाक, कना व घसा तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ, श्वसन रोग तज्ज्ञ आणि दंतरोग तज्ज्ञांचा समावेश असणार आहे.
स्तन कर्करोगाची विशेष तपासणी
स्तनाच्या कर्करोगाचे शून्य ते पहिल्या स्टेजमध्येच निदान झाल्यास तो पूर्णत: बरा होऊ शकतो. यामुळे या शिबिरात उपकरणाद्वारे स्तन कर्करोगाची तपासणी केली जाणार आहे.

  • दंत तपासणी करणाऱ्या लहान मुलांना टुथपेस्ट व ब्रश भेट म्हणून दिले जाईल


सखी मंच सदस्यांनीही घ्यावा लाभ
बुटीबोरीत होणाऱ्या या महाआरोग्य तपासणी शिबिरात महिलांसाठी विविध तपासण्या नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे या शिबिराचा लाभ लोकमत सखी मंच सदस्यांनीही घ्यावा, असे आवाहन लोकमत सखी मंचतर्फे करण्यात आले आहे.

या तपासण्या होतील

  •  हिमोग्लोबिन
  •  ईसीजी
  •  रक्तदाब
  •  रक्तातील साखरेचे प्रमाण
  •  अस्थमा
  •  चष्म्याचे नंबर काढून दिले जातील

Web Title: At Butibori Mega Health Checkup Camp today: Organised in Jyotsna Darda Memory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.