बुटीबोरीवासीयांनी जोपासलं ‘रक्ताचं नातं’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:07 AM2021-07-08T04:07:16+5:302021-07-08T04:07:16+5:30
बुटीबोरी : ‘लोकमत’च्यावतीने स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्व.जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंती पर्वावर ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेंतर्गत राज्यभर ...
बुटीबोरी : ‘लोकमत’च्यावतीने स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्व.जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंती पर्वावर ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेंतर्गत राज्यभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. याला साद देत बुधवारी बुटीबोरी येथील रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला.
बुटीबोरी येथील दुर्गा मंदिर येथे लोकमत, स्व.किशोरभाऊ वानखेडे बहूद्देशीय संस्था व परिवर्तन महिला समितीच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन बुटीबोरी नगर परिषदचे नगराध्यक्ष राजेश (बबलू ) गौतम यांनी केले. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मुजीब पठाण, माजी सभापती अहमदबाबू शेख, भाजपा मंडळ अध्यक्ष आकाश वानखेडे, मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे, उपाध्यक्ष व बांधकाम सभापती अविनाश गुर्जर, नियोजन सभापती अरविंद (मुन्ना) जयस्वाल, शिक्षण सभापती विनोद लोहकरे, आरोग्य सभापती अनिस बावला, पाणी पुरवठा सभापती मंदार वानखेडे, महिला व बालकल्याण सभापती संध्या आंबटकर, जिल्हा परिषद सदस्य अतिष उमरे, नगरसेवक प्रवीण शर्मा, सन्नी चव्हाण, बबलू सरफराज, मनोज ढोके, महेंद्र चव्हाण,आयुब पठाण,दीपक गुर्जर, महेंद्रसिंग चव्हाण, मंगेश आंबटकर, राजू गावंडे, बाबू पठाण, नीलेश माहुरकर,शमशाद पठाण,नंदा पाटील,ममता बारंगे,तुषार डेरकर उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी न.प.चे पाणी पुरवठा सभापती मंदार वानखेडे, रुपेश इचकाटे, महेश पटले, सुमीत मेंढे, लोकेश मामुलकर, दीपक बन, सचिन चंदेल, अंकित भोयर,अक्षय कुबेर, ऋषी जयस्वाल, निर्मला सातपुते, कल्पना गौरकर, राखी जयस्वाल,करुणा निकोसे, वहिदा शेख,सरिता गावंडे,नीता बहादुरे, रीता दखने यांनी सहकार्य केले. शिबिरात रक्तसंकलनाचे कार्य डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या चमूच्यावतीने करण्यात आले.
070721\img_20210707_115011.jpg
रक्तदान शिबिरात उपस्थित नगराध्यक्ष बबलू गौतम,भाजप मंडळ अध्यक्ष आकाश वानखेडे,ठाणेदार ओमप्रकाश कोकाटे,सभापती अरविंद (मुन्ना) जयस्वाल,सभापती विनोद लोहकरे व इतर मान्यवर.