नव्या एमआरआयची लवकरच खरेदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:07 AM2021-06-01T04:07:00+5:302021-06-01T04:07:00+5:30

-लोकमतचा प्रभाव नागपूर : मेडिकलमध्ये दीड वर्षांपासून ‘एमआरआय’सारख्या अद्ययावत उपचार तंत्राच्या अभावामुळे रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. याचा फटका ‘रेडिओलॉजी’त ...

Buy a new MRI soon! | नव्या एमआरआयची लवकरच खरेदी!

नव्या एमआरआयची लवकरच खरेदी!

Next

-लोकमतचा प्रभाव

नागपूर : मेडिकलमध्ये दीड वर्षांपासून ‘एमआरआय’सारख्या अद्ययावत उपचार तंत्राच्या अभावामुळे रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. याचा फटका ‘रेडिओलॉजी’त पदव्युत्तर अभ्यासक्रम करणाऱ्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांना बसत आहे. बंद ‘एमआरआय’मुळे आतापर्यंत सुमारे १० हजार रुग्णांना मेडिकलने खासगी किंवा मेयोचा रस्ता दाखविला आहे. ‘लोकमत’ने या संदर्भातील वृत्त प्रकाशित करताच मेडिकलमधील निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने पुढाकार घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन ‘एमआरआय’ उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी गडकरी यांनी तातडीने निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या.

आजची उपचार पद्धती ही तंत्रावर ठरत असताना ‘एमआरआय’ यंत्राच्या बाबतीत मात्र मेडिकल पिछाडीवर गेले आहे. रोगाचे अचूक निदान करताना अडथळे येत आहेत. एमआरआय’ची कालमर्यादा २०१८ मध्ये संपली. संबंधित कंपनीसोबत असलेला देखभालीचा कार्यकाळही संपला. यातच वारंवार हे यंत्र नादुरुस्त राहू लागल्याने त्यावर मोठा खर्च होऊ लागला परिणामी, २०१९ मध्ये ते बंद केले. मेडिकल प्रशासनाने नवे एमआरआय खरेदी करण्याच्या प्रस्तावावर तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खनिकर्म विभागातून १६ कोटी रुपयांचा निधी दिला. मेडिकल प्रशासनाने यंत्र खरेदीची जबाबदारी असलेल्या हाफकिन कंपनीकडे निधी वळता केला. परंतु कंपनीकडून तातडीने खरेदी प्रक्रिया राबविण्यात आली नाही. ‘एमआरआय’ नसल्याने मेडिकलमधील रेडिओलॉजी अभ्यासक्रमासाठी दरवर्षी प्रवेश घेणाऱ्या १६ विद्यार्थ्यांचे भवितव्य अडचणीत आले. धक्कादायक म्हणजे, तीन वर्षाच्या या अभ्यासक्रमात अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना ‘एमआरआय’वरील योग्य प्रशिक्षणाअभावीच परीक्षा देण्याची वेळ आली. या विद्यार्थ्यांना मेयोत प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येत असले तरी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. ‘लोकमत’ने २१ मे रोजी ‘मेडिकलमधील एमआरआय दीड वर्षापासून बंद’ या मथळ्याखाली या संदर्भातील वास्तव मांडले. वृत्ताची दखल घेत मेडिकल ‘मार्ड’ने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. गडकरी यांनी लागलीच जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याशी संपर्क साधून यातील अडचणी सोडवून खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. यामुळे लवकरच मेडिकलची एमआरआयची प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे. शिष्टमंडळात मेडिकल मार्डचे अध्यक्ष डॉ. सजल बन्सल, डॉ. अभय मुस्तापुरे, डॉ. मोहना शेवाळकर व भाजपा वैद्यकीय आघाडीचे डॉ. गिरीश चरडे उपस्थित होते.

Web Title: Buy a new MRI soon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.