शिल्लक धान खरेदी करा, नाही तर बाेनस द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:12 AM2021-05-05T04:12:07+5:302021-05-05T04:12:07+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : राज्य शासनाने नाेंदणीकृत शेतकऱ्यांकडील धानाचे पूर्णपणे माेजमाप न करता शासकीय धान खरेदी केंद्र ३१ ...

Buy the remaining grain, if not pay the bonus | शिल्लक धान खरेदी करा, नाही तर बाेनस द्या

शिल्लक धान खरेदी करा, नाही तर बाेनस द्या

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : राज्य शासनाने नाेंदणीकृत शेतकऱ्यांकडील धानाचे पूर्णपणे माेजमाप न करता शासकीय धान खरेदी केंद्र ३१ मार्च राेजी बंद केले. त्यामुळे रामटेक तालुक्यातील धान उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने एक तर शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेल्या धानाची खरेदी करावी, नाही तर त्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० रुपये बाेनस द्यावे या मागणीसाठी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमाेर साेमवारी (दि. ३) सकाळी प्रतीकात्मक आंदाेलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी याच मागणीचे उपविभागीय अधिकारी जाेगेंद्र कट्यारे यांच्याकडे निवेदनही साेपविले.

राज्य शासनाने आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने रामटेक तालुक्यात भंडारबाेडी (महादुला), पवनी, हिवराबाजार व बांद्रा या चार ठिकाणी तसेच महाराष्ट्रा राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून खरेदी विक्री संघाच्या मदतीने अन्य चार ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू केले हाेते. या केंद्रावर शेतकऱ्यांकडील धानाची किमान आधारभूत किमतीप्रमाणे खरेदी करण्यात आली असून, शेतकऱ्यांना पहिल्या ५० क्विंटलपर्यंत प्रति क्विंटल ७०० रुपयांचा बाेनस जाहीर करण्यात आला. या केंद्रांवर धान विकण्यासाठी शेतकऱ्यांनी नाेंदणीही करण्यात आली हाेती. मात्र, हे केंद्र काही नाेंदणीकृत शेतकऱ्यांकडील धानाचे माेजमाप पूर्ण हाेण्यापूर्वीच बंद करण्यात आले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे धान विक्रीविना शिल्लक आहे.

ताे धान व्यापाऱ्यांना कमी किमतीत विकावा लागत असल्याने नुकसान हाेत आहे. त्यामुळे शासनाने या धानाची खरेदी करावी अथवा ते शक्य नसल्याने नाेंदणीकृत शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० रुपये बाेनस देण्यात यावे, अशी मागणीही शेतकऱ्यांनी वेळी केली हाेती. आंदाेलनात भंडारबाेडी, महादुला, शिवणी, बाेरी येथील शेतकरी सहभागी झाले हाेते. भंडारबाेडीचे माजी सरपंच बलदेव कुमरे, नारायण झाडे, भागवत माेहने, हिंमत घाेडागाडे, दिनेश बडवाईक, वच्छला काठाेके यांनी उपविभागीय अधिकारी जाेगेंद्र कट्यारे यांच्याकडे निवेदन साेपविले. ही समस्या न साेडविल्यास गुरुवार (दि. ६)पासून आंदाेलन करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला.

...

१,९०० शेतकरी शिल्लक

नाेंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी खरेदी विक्री संघाकडे १,१०० तर आदिवासी विकास महामंडळाकडे ८०० शेतकऱ्यांकडील धान अद्यापही माेजणीविना पडून आहे. हे खरेदी केंद्र मध्यंतरी बरेच दिवस बंद ठेवण्यात आले हाेते. या खरेदी केंद्रावर किमान आधारभूत किमतीप्रमाणे म्हणजेच प्रति क्विंटल १,८६८ रुपयांप्रमाणे धानाची खरेदी करण्यात आली. शिवाय, शेतकऱ्यांना ७०० रुपये प्रति क्विंटल बाेनस जाहीर करण्यात आल्याने २,५६८ रुपये भाव मिळायचा. धान खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांना शिल्लक धान १,३०० रुपये प्रति क्विंटल दराने विकावा लागत आहे. हा दर किमान आधारभूत किमतीपेक्षा ५६८ रुपये कमी आहे. यात त्यांचे प्रति क्विंटल ५६८ ते १,२६८ रुपयांचे नुकसान हाेत आहे.

Web Title: Buy the remaining grain, if not pay the bonus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.