सीए डेमले, बिल्डर दाढेचा जामीन अर्ज फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 11:50 PM2018-01-10T23:50:12+5:302018-01-10T23:51:07+5:30

चिंचभवन येथील कोट्यवधी रुपयांच्या जमीन विक्रीशी संबंधित फसवणुकीच्या प्रकरणात दिव्या बिल्डर्स अ‍ॅन्ड रियल्टर्सचे कमलेश दाढे व सीए नारायण डेमले यांना सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला व त्यांचा संबंधित अर्ज खारीज केला.

CA Dameley, builder Dadhe's bail plea rejected | सीए डेमले, बिल्डर दाढेचा जामीन अर्ज फेटाळला

सीए डेमले, बिल्डर दाढेचा जामीन अर्ज फेटाळला

Next
ठळक मुद्देसत्र न्यायालय : जमीन विक्रीत फसवणुकीचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चिंचभवन येथील कोट्यवधी रुपयांच्या जमीन विक्रीशी संबंधित फसवणुकीच्या प्रकरणात दिव्या बिल्डर्स अ‍ॅन्ड रियल्टर्सचे कमलेश दाढे व सीए नारायण डेमले यांना सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला व त्यांचा संबंधित अर्ज खारीज केला.
पोलीस तक्रारीनुसार, २००६ ते २००८ या काळात पिरॅमिड रियल्टर्सचे भागीदार नावेद अली यांनी दिव्या बिल्डर्सची संबंधित जमीन १८ कोटी २२ लाख ५० हजार रुपयांत खरेदी करण्यासाठी करार केला होता. त्यानंतर दाढे व डेमले यांनी ६.६८ एकर जमिनीचे विक्री नोंदणीपत्र करून दिले तर, ५ कोटी ८१ लाख ५० हजार रुपये किमतीच्या ८.३९ एकर जमिनीचे विक्री नोंदणीपत्र करून देण्यास टाळाटाळ केली. विक्री नोंदणीपत्र करून दिलेली जमीनही शाळा व मैदानाकरिता आरक्षित होती. ले-आऊट आराखडा मंजूर करून घेताना अली यांना ही माहिती मिळाली. आरोपींनी यासंदर्भात काहीही सहकार्य केले नाही. त्यामुळे अली यांनी जून-२०१७ मध्ये एसआयटीकडे तक्रार नोंदवली. दरम्यान, आरोपींनी त्यांना सप्टेंबरपर्यंत वाद मिटविण्याचे आश्वासन दिले. ते आश्वासनही पाळण्यात आले नाही. परिणामी, अटक कारवाई होण्याची शक्यता लक्षात घेता, आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. गुन्हे शाखा पोलीस प्रकरणाचा तपास करीत असून, न्यायालयाच्या आदेशानंतर ते आरोपींवर आवश्यक कारवाई करण्याची शक्यता आहे.

Web Title: CA Dameley, builder Dadhe's bail plea rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.