नागपूर ‘विकासा’च्या अध्यक्षपदी सीए जितेन सागलानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:08 AM2021-06-25T04:08:22+5:302021-06-25T04:08:22+5:30
नागपूर : वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाऊंटंट स्टुडंट असोसिएशनच्या (विकासा) नागपूर शाखेच्या अध्यक्षपदाचा २०२१ वर्षाचा पदभार सीए जितेन सागलानी यांनी ...
नागपूर : वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाऊंटंट स्टुडंट असोसिएशनच्या (विकासा) नागपूर शाखेच्या अध्यक्षपदाचा २०२१ वर्षाचा पदभार सीए जितेन सागलानी यांनी स्वीकारला आहे. याप्रसंगी नागपूर सीए शाखेचे अध्यक्ष सीए साकेत बागडिया आणि पश्चिम विभागीय क्षेत्रीय परिषदेचे सदस्य सीए अभिजित केळकर उपस्थित होते. ही संस्था इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया, नवी दिल्लीच्या बोर्ड ऑफ स्टडीज अॅण्ड स्टुडंट एनरिचमेंट बोर्डअंतर्गत कार्य करते.
नवीन चमूत अमेय सोमान (उपाध्यक्ष), अविरल बरांगे (सचिव), राधिका तनेजा (कोषाध्यक्ष), करण अग्रवाल (सहसचिव), रविना तायडे (सहसंपादक), करण ताजणे (सहसंपादक) आणि पराग जैन (कार्यकारी सदस्य) या चार्टर्ड अकाऊंटन्सी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सागलानी यांनी ‘विकासा’चे माजी अध्यक्ष सीए अक्षय गुल्हाने यांचे आभार व्यक्त केले आणि २०२० मध्ये पश्चिम भारत स्तरावर नागपूर ‘विकासा’ शाखेला सर्वोत्कृष्ट शाखेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. यंदाही संस्था कार्यसंघ सर्वोत्तम काम करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. वर्ष २०२१ मध्ये व्यावहारिक, शैक्षणिक आणि अतिरिक्त अभ्यासक्रम उपक्रमाच्या माध्यमातून सीए कोर्स घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर राहील.
सीए साकेत बागडिया व सीए अभिजित केळकर म्हणाले, जितेन सागलानी यांच्या नेतृत्वातील चमू विविध उपक्रम राबवितील. विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये व्यस्त राहण्यासाठी प्रयत्न करावेत.