राष्ट्रविकासासाठी सीएंनी सरकारसोबत मिळून काम करावे : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:36 AM2019-04-20T00:36:51+5:302019-04-20T00:37:31+5:30
व्यापार आणि उद्योग क्षेत्रात कर संदर्भात येणाऱ्या समस्या सोडविण्यासह सीएंनी राष्ट्रविकासासाठी सरकारसोबत मिळून काम करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : व्यापार आणि उद्योग क्षेत्रात कर संदर्भात येणाऱ्या समस्या सोडविण्यासह सीएंनी राष्ट्रविकासासाठी सरकारसोबत मिळून काम करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी येथे केले.
इन्स्टिट्यूटऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागांतर्गत कार्यरत नागपूर सीए संस्थेच्या धंतोली येथील कार्यालयाला गोयल यांनी पहिल्यांदा भेट दिली आणि सीएंशी विविध विषयांवर संवाद साधला. गोयल म्हणाले, देशात जीएसटी लागू करणे हे आव्हानात्मक काम होते. योग्यरीत्या अमलात आणण्यात सीएंची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांनी जीएसटीवर सरकारची भूमिका स्पष्ट केली.
गोयल यांनी सीए कोर्सच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रारंभी आयसीएआय नागपूर शाखेचे अध्यक्ष सीए सुरेन दुरगकर यांनी पीयूष गोयल यांचे स्वागत केले. बँक ऑडिट आणि अन्य क्षेत्रातील पारदर्शकतेवर प्रकाश टाकताना सीए आज सर्वच क्षेत्रात प्रगती करीत असल्याचे दुरगकर म्हणाले. त्यांनी शासकीय स्थानिक संस्था आणि रेल्वे आदींच्या ऑडिटवर भर दिला. यावर विचार करण्याचे आश्वासन गोयल यांनी दिले. आरसीएम सीए अभिजित केळकर, पश्चिम विभागीय कौन्सिलचे माजी उपाध्यक्ष सीए जुल्फेश शाह यांनी विचार व्यक्त केले.
या प्रसंगी नागपूर संस्थेचे माजी अध्यक्ष सीए स्वप्निल घाटे व सीए स्वप्निल अग्रवाल, उपाध्यक्ष सीए किरीट कल्याणी, सचिव सीए साकेत बगडिया, विकासा अध्यक्ष सीए संजय अग्रवाल, कार्यकारिणी सदस्य सीए अक्षय गुल्हाने, सीए हरीश रंगवानी, सीए आशिष मुकीम, सीए जेठालाल रूखियाना, सीए नरेश जखोटिया, सीए डी.पी. सारडा यांच्यासह १०० पेक्षा जास्त सीए आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.