क्रिकेट सट्टेबाजीत सापडला सीए विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:07 AM2021-06-17T04:07:15+5:302021-06-17T04:07:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेला सीए चा विद्यार्थी सट्टेबाजीचा अड्डा चालवताना पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी धरमपेठ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेला सीए चा विद्यार्थी सट्टेबाजीचा अड्डा चालवताना पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी धरमपेठ येथील खरे टाऊनमधील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या या अड्ड्यावर छापा मारून सिवनी, मध्य प्रदेश येथील निवासी २४ वर्षीय शुभम शंकरलाल राय यास अटक केली आहे. क्रिकेटच्या सट्टेबाजीत सीएचा विद्यार्थी हाती आल्याची ही पहिलीच घटना आहे.
खरे टाऊन, धरमपेठ येथील सदाशिव अपार्टमेंटमध्ये शुभम भाड्याने राहतो. त्याचे वडील शेतकरी तर आई शिक्षिका आहे. बी.कॉम.चे शिक्षण झाल्यानंतर शुभम नागपूरला आला. बी.कॉम. आणि एम.कॉम. झाल्यावर तो सीएची तयारी करत होता. एम.कॉम.चे शिक्षण घेत असताना तो खरे टाऊन येथे एका मित्रासोबत राहत होता. त्याच्या मित्राला सट्टेबाजीबाबत माहिती होती. शुभमने त्याच्याकडून ही माहिती घेतली. पॉकेटमनीसाठी शुभम लहान-मोठे काम करत होता. सीएमध्ये प्रवेश घेतल्यानंतर लॉकडाऊन लागले आणि तो बेरोजगार झाला. फ्लॅटचे भाउे आणि दुसरे खर्च चालविण्यात अडचण होऊ लागली. त्यामुळे, त्याने क्रिकेट सट्टेबाजी सुरू केली. आठ महिन्यापूर्वी सदाशिव अपार्टमेंटमध्ये फ्लॅट भाड्याने घेऊन तो अड्डा चालवायला लागला. त्याला ग्राहकही मिळाले होते.
काही दिवसापूर्वी क्रिकेटचे सामने बंद पडल्याने शुभम सिवनीला गेला होता. ७ जून रोजी तो नागपूरला परतला. तेव्हापासून तो पाकिस्तान सुपर लिग २०-२० मध्ये लाहौर विरुद्ध क्वेटा दरम्यान सुरू असलेल्या सामन्यावर सट्टा लावत होता. मंगळवारी रात्री अपर आयुक्त नवीन रेड्डी व डीसीपी विनिता साहू यांना शुभमच्या अड्ड्याची माहिती मिळाली. त्यांनी अंबाझरी व गिट्टीखदानच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पथक बनवून कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर पोलिसांनी शुभमच्या फ्लॅटवर छापा मारला. तो टीव्हीवर क्रिकेटचे सामने बघून सट्टेबाजी करत होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्याकडून ७ मोबाईल, ३ टॅब, हार्ड डिस्क, रोख ६७ हजार व कारसह ५.२७ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई अपर आयुक्त नवीन रेड्डी, डीसीपी विनिता साहूचे पीआय अतुल सबनीस, एपीआय अचल कपूर, पीएसआय कुणाल धुरट, सचिन जाधव, हवालदार अनिल त्रिपाठी, रामदास नारेकर, प्रशांत देशमुख, राकेश गोतमारे, आशिष वानखेडे व अमित भुरे यांनी केली.
--
बॉक्स ....
ट्रेनर लंडनला गेला
शुभमला त्याच्याच फ्लॅटमध्ये राहणाऱ्या युवकाने क्रिकेट सट्टेबाजीतील किरकोळ माहिती दिल्या होत्या. नंतर तो युवक उच्च शिक्षणासाठी लंडनला केला आहे. प्रारंभिक तपासात त्या युवकाची शुभमच्या कृत्यात कोणतीच भूमिका दिसत नाही. पोलीस शुभमसोबत जुळलेल्या अन्य सट्टेबाजांचा वेध घेत आहेत.
..................