केबल व्यावसायिकाचा खून

By admin | Published: January 8, 2015 01:17 AM2015-01-08T01:17:09+5:302015-01-08T01:17:09+5:30

कौटुंबिक वादातून झालेल्या भांडणात जरीपटका परिसरातील एका केबल व डीजे व्यावसायिकाचा त्याच्याच साळ्याने खून केला. ही घटना मंगळवारी १०.४५ वाजताच्या सुमारास मेकोसाबाग येथे घडली.

Cable businessman's blood | केबल व्यावसायिकाचा खून

केबल व्यावसायिकाचा खून

Next

कौटुंबिक वाद : साळ्याने जावयास संपविले
नागपूर : कौटुंबिक वादातून झालेल्या भांडणात जरीपटका परिसरातील एका केबल व डीजे व्यावसायिकाचा त्याच्याच साळ्याने खून केला. ही घटना मंगळवारी १०.४५ वाजताच्या सुमारास मेकोसाबाग येथे घडली.
मुकेश जोगिंदर सिंह (३८) रा. आकार बिल्डिंग बैरामजी टाऊन असे मृताचे नाव आहे. तर पहलाज ऊर्फ कालू सुरेश सादीचा (२४) रा. मेकोसाबाग सिंधी कॉलनी असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला जरीपटका पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस सूत्रानुसार बैरामजी टाऊन येथील मुकेश सिंह याने २००५ साली कालूची बहीण सोनिया हिच्याशी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर मुकेश सोनियाला लहान-सहान गोष्टीसाठी मारहाण करू लागला. तो डीजे व केबलचा व्यवसाय करीत होता. या व्यवसायात त्याच्यासोबत साळा पहलाज ऊर्फ कालू सुद्धा काम करीत होता. मुकेशच्या सततच्या त्रासाला कंटाळून कालूची बहीण सोनिया ही आपल्या माहेरी मेकोसाबाग येथेच राहायला आली. मुकेश सिंहने तिला अनेकदा घरी नेण्याचा प्रयत्न केला परंतु ती सासरी परतली नाही.
मंगळवारी ६ जानेवारी रोजी रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास मुकेश आपल्या सासरी तलवार घेऊन गेला. सोनियाच्या आई-वडिलांशी भांडण करीत तो सोनियाला जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. वाद वाढताना पाहून मुकेशचा साळा कालूने मध्यस्ती केली. कालू मध्ये पडताच मुकेशने सोनियाला सोडले आणि तो कालूशी भिडला. तो त्याला केबल-डीजेच्या व्यवसायातील १० लाखरुपये परत मागू लागला. यावरून दोघांमध्येच भांडण झाले. मुकेश कालूला मारहाण करू लागला. स्वत:ला सोडवत कालू घराबाहेर निघाला. अंगणातील चुलीजवळ जळावू लाकूड ठेवले होते. कालूने त्यातील एक लाकूड उचलले आणि मुकेशच्या डोक्यावर प्रहार केला. यात मुकेशचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांना सूचना देण्यात आली. जरीपटका पोलीस ठाण्याचे निरीक्षक हारगुडे सहकाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविले. मृत मुकेशची पत्नी सोनियाच्या तक्रारीनुसार आरोपी कालूच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
जावई-साळ्यात अनेकदा झाला होता वाद
मृत मुकेश सिंह आणि त्याचा साळा कालू यांच्यात अनेकदा वाद झाले होते. या वादामुळेच कालूने आपल्या जावयासोबत केबल व डीजेचा व्यवसाय बंद केला. यावरूनही त्यांच्यात राग होता.

Web Title: Cable businessman's blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.