केबल ऑपरेटरकडे ३१ मार्चपर्यंत नोंदणीची मुभा : ट्रायचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:42 AM2019-02-14T00:42:17+5:302019-02-14T00:43:39+5:30

लोकमत  न्यूज नेटवर्क  नागपूर : देशातील सर्व चॅनल्स १५ फेब्रुवारीपासून बंद होणार होते. पण आता ट्रायच्या मंगळवारच्या आदेशानुसार चॅनल ...

The cable operator will be entitled for registration till March 31: TRAI instructions | केबल ऑपरेटरकडे ३१ मार्चपर्यंत नोंदणीची मुभा : ट्रायचे निर्देश

केबल ऑपरेटरकडे ३१ मार्चपर्यंत नोंदणीची मुभा : ट्रायचे निर्देश

Next
ठळक मुद्देग्राहकांना सेवा पूर्ववत मिळणार

लोकमत  न्यूज नेटवर्क 
नागपूर : देशातील सर्व चॅनल्स १५ फेब्रुवारीपासून बंद होणार होते. पण आता ट्रायच्या मंगळवारच्या आदेशानुसार चॅनल ३१ मार्चपर्यंत निरंतर सुरू राहणार आहे. ज्यांनी चॅनल निवडले आहेत, त्यांना पैसे परत मिळणार नाहीत. पण ज्यांचे महिनेवारी शुल्कानुसार चॅनल सुरू आहेत, त्यांची त्याच शुल्कात पेड चॅनलची सेवा सुरू राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र केबल ऑपरेटर फाऊंडेशन विदर्भाचे अध्यक्ष सुभाष बांते यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.
३१ मार्चपर्यंत ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच महिनेवारीनुसार शुल्क द्यायचे आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास ग्राहक जर महिन्याला ३०० रुपये केबल शुल्क देत असेल त्याला तेवढ्याच किमतीचे पेड चॅनल पाहता येतील. ट्रायच्या नवीन आदेशामुळे पॅकेज निवडलेल्या ग्राहकांच्या प्रांतीय भाषांकडे लक्ष देणे कठीण होणार आहे. बांते म्हणाले, पॅकेजची निवड केलेल्यांची त्याच किमतीत केबल सेवा सुरू राहील. खरं पाहता १ जानेवारीपासून पॅकेज सिस्टीममुळे वसुलीवर बे्रक लागला आहे. ग्राहक नोंदणीसाठी एकाच वेळी येत असल्यामुळे यंत्रणेअभावी त्यांचे पॅकेज लॉगईन करण्यास उशीर होत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम पसरला आहे. पण ग्राहकांना निरंतर सेवा देण्यासाठी केबल आॅपरेटर्स दिवसरात्र काम करीत आहेत.
प्रारंभी १०० फ्री टू एअर चॅनलसाठी १३० रुपये आणि त्यावर १८ जीएसटी असे एकूण १५४ रुपये ग्राहकांना द्यायचे आहेत. त्यात २५ चॅनल दूरदर्शनचे असून उर्वरित भाषिक चॅनल्स आहेत. त्यानंतर ग्राहकांना एमएसओचे पॅकेज निवडायचे आहेत. ट्रायच्या आदेशानुसार ग्राहकांना १८ टक्के जीएसटीसह २५ पेड चॅनलसाठी २० रुपये नेटवर्क कॅपॅसिटी फी वेगळी लागणार आहे.
बांते म्हणाले, सर्व चॅनलवर जीएसटीच्या आकारणीपूर्वी केबल इंडस्ट्री असंघटित होती, पण आता सर्व चॅनलवर जीएसटीच्या आकारणीमुळे ही इंडस्ट्री संघटित झाली आहे. प्रत्येक चॅनलवर जीएसटी आकारण्यात येत आहे. पूर्वीपेक्षा मार्जिन कमी झाली आहे. काम करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. केबल ऑपरेटर्सतर्फे कर्मचाऱ्यांना संबंधित सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. ट्रायने तक्रारीसाठी कॉल सेंटर बनविले आहे. ब्रॉडकास्टर्सच्या जाहिरातींचा ओघ कमी झाल्यास पुढे पेड चॅनलचे दर कमी होतील. बांते म्हणाले, आमचे कमिशन अजूनही ठरले नाही. ते वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे.
पत्रपरिषदेत फाऊंडेशनचे पदाधिकारी प्रभात अग्रवाल, संजय लाकूडकर आणि अनेक केबल ऑपरेटर्स उपस्थित होते.

Web Title: The cable operator will be entitled for registration till March 31: TRAI instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.