नागपुरात बिबट्याला पकडण्यासाठी लावले जाताहेत पिंजरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 11:16 AM2019-12-09T11:16:50+5:302019-12-09T11:17:12+5:30

अंबाझरी जैवविविधता पार्क वनक्षेत्र परिसरात आढळून आलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे (ट्रॅपिंग केज) लावले जात आहेत.

Cages are planted in Nagpur to capture leopard | नागपुरात बिबट्याला पकडण्यासाठी लावले जाताहेत पिंजरे

नागपुरात बिबट्याला पकडण्यासाठी लावले जाताहेत पिंजरे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंबाझरी जैवविविधता पार्क वनक्षेत्र परिसरात आढळून आलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे (ट्रॅपिंग केज) लावले जात आहेत. यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्प आणि इतर अभयारण्य क्षेत्रातूनही पिंजरे मागवण्यात आले आहेत. दरम्यान शनिवारी आणि रविवारी परिसरातील कुठल्याही सीसीटीव्हीमध्ये बिबट्या दिसून आल्याची माहिती नाही.
बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी वनक्षेत्रात सातत्याने गस्त घातली जात आहे. काही गवताळ मैदानी भागात शोधण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याची मदतसुद्धा घेतली जात आहे. वाडी परिसरात बिबट्याने एका डुकराची शिकार केल्याचे परिसरातील सीसीटीव्हीमध्ये आढळून आले होते. तेव्हापासून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिहानचा वाघ तेल्हाºयात
मिहान परिसरातील वाघ शनिवारी टाकळघाट आणि कान्होलीबारा मार्ग ओलांडून बोर अभयारण्याच्या दिशेने निघाला होता. त्यामुळे वाघाला बेशुद्ध करून पकडण्याची योजना थांबवण्यात आली आहे. परंतु रविवारी पुन्हा एकदा वाघ तेल्हारा तलावाजवळ दिसून आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे वन अधिकारी संबंधित परिसरात त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Cages are planted in Nagpur to capture leopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.