तलवारीने केक कापले, पोलिसांनी तुरुंगात टाकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 22:47 IST2020-10-22T22:45:43+5:302020-10-22T22:47:48+5:30
Cake cut with sword , police kept behind the bar, Crime news, Nagpur तलवारीने वाढदिवसाचा केक कापणाऱ्या विद्यार्थ्याला गुन्हे शाखेने अटक केली आहे.

तलवारीने केक कापले, पोलिसांनी तुरुंगात टाकले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तलवारीने वाढदिवसाचा केक कापणाऱ्या विद्यार्थ्याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. निखिल लोकचंद पटले (१९) रा. भोलेनगर, भांडेवाडी असे आरोपीचे नाव आहे. निखिलचा २१ ऑक्टोबरला वाढदिवस होता. त्याच्या मित्रांनी चार केक आणले होते. काही दिवसांपासून युवकांमध्ये तलवारीने केक कापण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. निखिलने आपल्या मित्रांसोबत तलवारीने केक कापून त्याचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले. याची माहिती मिळताच गुन्हे शाखेत खळबळ उडाली. युनिट पाचने निखिलला अटक करून हत्यार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई निरीक्षक विनोद पाटील, उपनिरीक्षक ओमप्रकाश भलावी, विजय यादव, विलास चिंचुलकर, सचिन आंधळे, प्रफुल्ल पारधी यांनी पार पाडली.