मौन पदयात्रेतून संवैधानिक सहिष्णुता टिकविण्याची हाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 10:26 PM2018-01-30T22:26:14+5:302018-01-30T22:28:08+5:30
देशाचे वातावरण सध्या पूर्वीसारखे राहिले नाही. धर्माच्या नावाखाली लोकांची माथी भडकवून देशात अराजकता निर्माण करण्याचा कट शिजतोय. देशाची शांतता आणि संविधानाने दिलेले विचारस्वातंत्र्य नष्ट करून पुन्हा ‘कोड आॅफ मनू’ लागू करण्याचे हे षड्यंत्र आहे. नागरिकांनो हे षड्यंत्र ओळखा आणि संविधानाची सहिष्णुता टिकविण्यासाठी एकत्रित या, असा संदेश देताना दक्षिणायानच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवारी दीक्षाभूमीहून मौन पदयात्रा काढली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाचे वातावरण सध्या पूर्वीसारखे राहिले नाही. धर्माच्या नावाखाली लोकांची माथी भडकवून देशात अराजकता निर्माण करण्याचा कट शिजतोय. देशाची शांतता आणि संविधानाने दिलेले विचारस्वातंत्र्य नष्ट करून पुन्हा ‘कोड आॅफ मनू’ लागू करण्याचे हे षड्यंत्र आहे. नागरिकांनो हे षड्यंत्र ओळखा आणि संविधानाची सहिष्णुता टिकविण्यासाठी एकत्रित या, असा संदेश देताना दक्षिणायानच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवारी दीक्षाभूमीहून मौन पदयात्रा काढली.
सत्य, अहिंसा व संविधान सुरक्षेचा संदेश देण्यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर, राजमोहन गांधी व दक्षिणायनचे डॉ. गणेश देवी यांच्या नेतृत्वात निघालेल्या मौन पदयात्रेत देशभरातील पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणारे नामवंत साहित्यिक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते. यामध्ये कुमार शिराळकर, कुमार केतकर, रावसाहेब कसबे, मेधा पाटकर, मेधा पानसरे, उल्का महाजन, लीलाताई चितळे, डॉ. प्रज्ञा दया पवार, राजन अनवर , विद्या बाळ, शारदा साठे, नागेश चौधरी, धनाजी गुरव, राजन खान, डॉ. क्रिष्णा कांबळे, अमिताभ पावडे, कवी ज्ञानेश वाकुडकर, सुनैना आझाद, भालचंद्र कांगो, अरुणा सबाने, ई. झेड. खोब्रागडे, हरिभाऊ केदार, प्रा. प्रमोद मुनघाटे, जनमंचचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील, विलास भोंगाडे, डॉ. हरीश धुरट, प्रज्ज्वला तट्टे, विभा पुरी दास, के. के. चक्रवर्ती, प्रा. अंजली मायदेव, आसाराम लोमटे, प्रफुल्ल शिलेदार, रजिया पटेल, हमीद दाभोळकर, दामोदर मौझो, दत्ता नाईक, राजन खान, वीरा राठोड, प्रल्हाद लुलेकर, वैशाली रोडे, प्रभु राजगडकर, के. नीला, सुरेखा देवी, भारती शर्मा, मंदार काळे, निशा शिरुरकर, मीनल सोहनी, शिवाजी गायकवाड, अभय कांता, सुधीर देसाई, संदेश प्रभुदेसाई, प्रतिभा शिंदे, निला लिमये, सुनिती धारवडकर, सुरेश सावंत, वसंत एकबोटे, मीनाक्षी बाली, सत्यपाल राजपूत, वनराज तुळजापूरकर, धनंजय कांबळे, नीता साने, शमसुद्दीन तांबोळी, सुनयना अजात, वनराज चावला, पल्लवी चौधरी, चेतना दीक्षित तसेच जमाते इस्लामीचे डॉ. अनवर सिद्दीकी, इरशाद खान, महिला अध्यक्ष डॉ. साबिया यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले.
सुरुवातीला दीक्षाभूमीवर तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करीत पदयात्रा सुरू करण्यात आली. हातात देशातील महापुरुषांचे फोटोसह अनेक प्रकारचे संदेश देणारे फलक घेऊन व्हेरायटी चौकात महात्मा गांधी यांना नमन करण्यात आले. धनवटे नॅशनल कॉलेजला पदयात्रेचे समापन करण्यात आले.