नागपुरात सार्वजनिक ठिकाणी थूंकणाऱ्यांवर कॅमेऱ्यांची नजर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 10:08 PM2018-11-06T22:08:51+5:302018-11-06T22:11:54+5:30

केंद्र शासनाने घनकचरा व्यवस्थापन नियम लागू केले आहेत. स्वच्छतेसाठी या नियमांची शहरात अंमलबजावणी होत आहे. उपद्रव शोध पथक व शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी थूंकणाऱ्यांवर, घाण करणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. घाण करणाऱ्यांवर दंड आकारला जात आहे. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी केले आहे.

Cameras watch who spitting in public place in Nagpur | नागपुरात सार्वजनिक ठिकाणी थूंकणाऱ्यांवर कॅमेऱ्यांची नजर 

नागपुरात सार्वजनिक ठिकाणी थूंकणाऱ्यांवर कॅमेऱ्यांची नजर 

Next
ठळक मुद्देनागपुरात सार्वजनिक ठिकाणी थूंकणाऱ्यांवर कॅमेऱ्यांची नजर 

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र शासनाने घनकचरा व्यवस्थापन नियम लागू केले आहेत. स्वच्छतेसाठी या नियमांची शहरात अंमलबजावणी होत आहे. उपद्रव शोध पथक व शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी थूंकणाऱ्यांवर, घाण करणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. घाण करणाऱ्यांवर दंड आकारला जात आहे. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी केले आहे.
घनकचरा व्यवस्थाफन नियम,२०१६ नुसार सार्वजनिक ठिकाणी घाण निर्माण करणे, हा कायद्यानुसार गुन्हा आहे. यात दोषींना दंड आकारण्याचे अधिकार महापालिका, नगर परिषदा, नगर पालिकांना दिले आहेत.

प्लास्टिक कचरा व्यवस्थापन
केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट नियम २०१६ लागू करण्यात आले आहेत. अविघटित कचऱ्यामुळे स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीवर परिणाम होत आहे. राज्यात प्लास्टिक व थर्माकोल वापरावर बंदी घालण्यात आली आहे. या नियमांची शहरात कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

ओला व सुका कचरा वेगळा ठेवा
घनकचरा नियमानुसार ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करणे आवश्यक आहे. नागरिकांनी असा कचरा वेगवेगळा ठेवून महापालिकेने नियुक्त केलेल्या एजन्सी वा व्यक्तीकडे जमा करणे बंधनकारक आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

असा आहे दंड

रस्ते, सार्वजनिक ठिकाणी घाण करणे १८०, सार्वजनिक ठिकाणी थूंकणे १५०,उघड्यावर लघवी करण २०० आणि
उघड्यावर शौच करणे ५००   रुपये .

Web Title: Cameras watch who spitting in public place in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.