प्रचार संपला, 19 एप्रिलला मतदान; प्रशासन सज्ज, २१ हजारांवर कर्मचारी तैनात 

By आनंद डेकाटे | Published: April 17, 2024 09:10 PM2024-04-17T21:10:08+5:302024-04-17T21:12:26+5:30

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी याबाबत बुधवारी सविस्तर माहिती दिली. यावेळी ग्रामीण पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार उपस्थित होते.

Campaign ends, polls on April 19; Administration ready, 21 thousand employees deployed | प्रचार संपला, 19 एप्रिलला मतदान; प्रशासन सज्ज, २१ हजारांवर कर्मचारी तैनात 

प्रचार संपला, 19 एप्रिलला मतदान; प्रशासन सज्ज, २१ हजारांवर कर्मचारी तैनात 

नागपूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठीचा प्रचार बुधवारी सायंकाळी ५ वाजता संपला. आता प्रशासन मतदानासाठी सज्ज झाले आहे. निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी याबाबत बुधवारी सविस्तर माहिती दिली. यावेळी ग्रामीण पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार उपस्थित होते.

इटनकर यांनी सांगितले की, नागपूर आणि रामटेक या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत एकूण ४,५१० मतदान केंद्रे आहेत. यामध्ये रामटेकमध्ये २,४०५ तर नागपूरमध्ये २,१०५ मतदान केंद्रे राहणार आहेत. जिल्ह्यातील एकूण ४२ लाख ७२ हजार ३६६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. संपूर्ण मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण २१ हजार ६४८ अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त राहणार आहे.

- पोलिंग पार्टी आज रवाना होणार
मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या पोलिंग पार्टींना गुरुवारी ईव्हीएम बॅलेटसह सर्व साहित्याचे वितरण करण्यात येईल. विधानसभानिहाय तयार करण्यात आलेल्या स्ट्राँगरूम परिसरात या साहित्याचे वितरण दिवसभर चालेल. सर्व पोलिंग पार्टी सायंकाळपर्यंत आपापल्या मतदान केंद्रावर पोहाेचतील. मतदानाची व्यवस्था करतील आणि तसा अहवाल सादर करतील.

- सकाळी ६ वाजता ‘मॉक पोल’
मतदान केंद्रावर सकाळी ६ वाजता ‘मॉक पोल’ घेण्यात येईल. हे ‘मॉक पोल’ पोलिंग एजंटच्या उपस्थितीत होईल. ते ७ वाजेपर्यंत चालेल. त्यानंतर मतदानास सुरुवात होईल.

- मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत
मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. मतदान केंद्रात ६ वाजेपर्यंत रांगेत असलेल्या प्रत्येक मतदारास मतदान अधिकारी कूपन देतील. ज्यांच्याजवळ कूपन असेल, त्यांचे मतदान होईपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू राहील.

- विधानसभानिहाय मतदान केंद्र
नागपूर लोकसभा
नागपूर दक्षिण-पश्चिम - ३७०
नागपूर दक्षिण - ३४९
नागपूर पूर्व - ३५४
नागपूर मध्य - ३०५
नागपूर पश्चिम -३३५
नागपूर उत्तर - ३९२

एकूण - २१०५
रामटेक लोकसभा
काटोल - ३२८
सावनेर - ३६७
हिंगणा - ४५८
उमरेड - ३८७
कामठी - ५०८
रामटेक - ३५७
एकूण - २४०५
 

Web Title: Campaign ends, polls on April 19; Administration ready, 21 thousand employees deployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.