रेल्वे रुळावर येणाऱ्या जनावरांना रोखण्यासाठी अभियान ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:07 AM2021-05-27T04:07:57+5:302021-05-27T04:07:57+5:30

नागपूर : रेल्वे रुळावर गावातील जनावरे येत असून, रेल्वेगाडीची धडक बसल्यामुळे त्यांचा जीव जात आहे. अशा घटना वाढल्या असून ...

Campaign to prevent animals from entering the railway tracks () | रेल्वे रुळावर येणाऱ्या जनावरांना रोखण्यासाठी अभियान ()

रेल्वे रुळावर येणाऱ्या जनावरांना रोखण्यासाठी अभियान ()

Next

नागपूर : रेल्वे रुळावर गावातील जनावरे येत असून, रेल्वेगाडीची धडक बसल्यामुळे त्यांचा जीव जात आहे. अशा घटना वाढल्या असून त्या थांबविण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने अभियान सुरू केले आहे.

रेल्वे रुळावर जनावरे आल्यानंतर ते रेल्वेखाली येऊन मृत्यू पावत आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांच्या जीवितासही धोका निर्माण होत असून, रेल्वे संपत्तीचेही नुकसान होत आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाने अशा घटना थांबविण्यासाठी अभियान सुरू केले आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी, जवान गावोगाव जाऊन तेथील सरपंच, नागरिकांच्या भेटी घेऊन जागरूकता करीत आहेत. आपल्या जनावरांना मोकळे सोडू नका, रेल्वे रुळाजवळ जाऊ देऊ नका, अशा सूचना ते देत आहेत. रेल्वे रुळावर जनावरे आढळल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, असेही ते सांगत आहेत. या उपक्रमाला गावातील नागरिकही प्रतिसाद देऊन जनावरांना मोकळे सोडणार नसल्याचे आश्वासन देत आहेत.

..........

Web Title: Campaign to prevent animals from entering the railway tracks ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.