नायलॉन मांजावर कायम बंदी आणू शकता काय?
By admin | Published: January 8, 2016 03:37 AM2016-01-08T03:37:41+5:302016-01-08T03:37:41+5:30
नायलॉन मांजावर कायमची बंदी आणू शकता काय, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी शासनास करून ...
हायकोर्टाची विचारणा : सोमवारपर्यंत मागितले उत्तर
नागपूर : नायलॉन मांजावर कायमची बंदी आणू शकता काय, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी शासनास करून यावर येत्या सोमवारी उत्तर सादर करण्यास सांगितले.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व प्रदीप देशमुख यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
तहसील कार्यालयातील अधिकारी अवैधरीत्या नायलॉन मांजा जप्त करीत आहेत व पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवित आहेत असा दावा करून रिद्धी सिद्धी पतंग व्यापारी संघटनेने रिट याचिका दाखल केली आहे.
मकरसंक्रांत काळात पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजा व त्यासारखा अन्य कोणताही धोकादायक कृत्रिम धागा वापरण्यावर राज्य शासनाने बंदी आणली आहे. याशिवाय, मकरसंक्रांतीच्या काळात ठोक विक्रेत्यांना नायलॉन मांजाचा साठा व विक्री करता येत नाही. पर्यावरण विभागाने पर्यावरण (संरक्षण) कायदा-१९८६ मधील कलम ५ अंतर्गत यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजा किंवा त्यासारखा अन्य कोणताही धोकादायक धागा वापरण्यास परवानगी देऊ नये. ठोक विक्रेत्यांना मकरसंक्रांतीच्या आधीच नायलॉन मांजाची विक्री करण्यापासून थांबविण्यात यावे. नायलॉन मांजापासून होणाऱ्या नुकसानीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत.